डोंबिवली स्थानकातील तिकिट कार्यालयाच्या दिशादर्शक फलकाची धोकादायक अवस्था; एक साखळी निखळल्याने कधीही पडू शकतो

By अनिकेत घमंडी | Published: May 29, 2024 05:38 PM2024-05-29T17:38:10+5:302024-05-29T17:38:47+5:30

येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर कल्याण दिशेकडे असलेल्या तिकीट कार्यालयाचा दिशादर्शक फलकाची धोकादायक अवस्था झाली आहे.

Dangerous condition of ticket office sign board at Dombivli station | डोंबिवली स्थानकातील तिकिट कार्यालयाच्या दिशादर्शक फलकाची धोकादायक अवस्था; एक साखळी निखळल्याने कधीही पडू शकतो

डोंबिवली स्थानकातील तिकिट कार्यालयाच्या दिशादर्शक फलकाची धोकादायक अवस्था; एक साखळी निखळल्याने कधीही पडू शकतो

डोंबिवली: येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर कल्याण दिशेकडे असलेल्या तिकीट कार्यालयाचा दिशादर्शक फलकाची धोकादायक अवस्था झाली आहे. त्याची एक साखळी निखळली असून तो फलक कलंडला आहे. रेल्वे स्टेशन मास्तर, रेल्वे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन हा फलक पूर्ववत करावा, अशी मागणी प्रवासी शेखर जोशी यांनी केली आहे.

ते म्हणाले की, डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर (होम प्लॅटफॉर्म) कल्याण दिशेकडे तिकीट कार्यालय आहे. याच फलाटावर डोंबिवली स्थानक स्टेशन मास्तरांचे तसेच डोंबिवली लोहमार्ग पोलीस कार्यालय आहे. तिकिट कार्यालय आणि पश्चिमेला बाहेर पडण्यासाठीचे प्रवेशद्वार येथे असल्याने हा भाग कायम गजबजलेला असतो. प्रवाशांची जा-ये सतत सुरू असते, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका।होऊ शकतो. या धोकादायक फलकाच्या एका बाजूची साखळी निखळली आहे.

एक जी साखळी निखळली, तुटली तर हा जड फलक जाणा-या येणाऱ्या किंवा तिथे उभ्या असलेल्या प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते किंवा कोणी गंभीर जखमी होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत स्थानक अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या विषयी दुरुस्ती विभागाला कळवले असून लवकरच सुधारणा।होईल. 

Web Title: Dangerous condition of ticket office sign board at Dombivli station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.