आधार कार्डावरुन पटली तिच्या मृतदेहाची ओळख; प्रियकरच निघाला तिचा मारेकरी

By मुरलीधर भवार | Published: January 5, 2023 03:16 PM2023-01-05T15:16:15+5:302023-01-05T15:18:24+5:30

प्रियकरासह त्याच्या साथीदाराला पाेलिसानी ठाेकल्या बेड्या

dead body was identified from aadhaar card and her boyfriend turned out to be her killer | आधार कार्डावरुन पटली तिच्या मृतदेहाची ओळख; प्रियकरच निघाला तिचा मारेकरी

आधार कार्डावरुन पटली तिच्या मृतदेहाची ओळख; प्रियकरच निघाला तिचा मारेकरी

Next

कल्याण- प्रेमसंबंधातून  लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने आपल्या एका मित्रासोबत विविहित महिलेची ३५ वार करत  हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे घडली आहे .मयत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथे राहत होती. टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढळून आल्याने आधार कार्डच्या सहाय्याने  पोलिसांनी तिची ओळख पटली. तिची हत्या करणारा प्रियकर जयराज चौरेसह त्याचा मित्र  सूरज घाटे या दोघांना टिटवाळा पाेलिसांनी  अटक केली.

टिटवाळा येथील गोवेली परिसरात १२ डिसेंबरला एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्राने तब्बल ३५ वार करण्यात आले होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान महिलेजवळ तिच्या आधार कार्ड सापडले होते. या आधार कार्डच्या आधारे या मयत महिलेची ओळख पटवली. या मयत महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला. रुपांजली जाधव असे महिलेचे नाव असून ती पुण्याला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

रुपांजली जाधव ही विवाहित असून तिला तीन मुले आहेत. दोन वर्षांपासून रुपांजलीचे पुण्यात राहणाऱ्या जयराज चौरे याच्याशी प्रेमसंबंध होते . रुपांजली जयराज याच्याकडे लग्नासाठी तगादा लावत हाेती. जयराजला ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे जयराज संतापला होता. अखेर जयराजने रुपंजलीला संपवण्याचा निर्णय घेतला. जयराजने  रूपांजलीला दागिने घेऊन देतो असे सांगत तिला टिटवाळ्याला घेऊन आला. टिटवाळा येथील गोवेली परिसरात जयराज व  त्याचा मित्र सुरज घाटे यांनी  रुपांजलीवर धारदार शस्त्राने  वार करत तिची हत्या केली. त्यानंतर त्या दोघांनी पळ काढला. तेथून पळून गेले. रुपांजली असा काटा काढण्यासाठी त्याने मित्र मदत घेत तिची हत्येचा कट रचला होता. तिची हत्या करण्यासाठी त्याने  उल्हासनगर येथून दोन चाकू देखील खरेदी केले होते. अखेर टिटवाळा पोलिसांनी जयराज आणि त्याचा मित्र सुरज या दोघांना अटक केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: dead body was identified from aadhaar card and her boyfriend turned out to be her killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.