कल्याण दुर्गाडी खाडीवरील नव्या पूलाच्या दोन लेनचे लोकार्पण ३१ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:47 PM2021-05-28T17:47:29+5:302021-05-28T17:48:09+5:30

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण; शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती

Dedication of two lanes of new bridge over Kalyan Durgadi creek on 31st May | कल्याण दुर्गाडी खाडीवरील नव्या पूलाच्या दोन लेनचे लोकार्पण ३१ मे रोजी

कल्याण दुर्गाडी खाडीवरील नव्या पूलाच्या दोन लेनचे लोकार्पण ३१ मे रोजी

googlenewsNext

 

कल्याण-भिवंडी-कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहा पदरी पूलापैकी दोन लेनचे काम पूर्ण झाले आहे. या दोन लेनचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३१ मे रोजी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. दोन लेनच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी आज आमदारांनी केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
याप्रसंगी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी रविंद्र कपोते, शरद पाटील, प्रभूनाथ भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावरील दुर्गाडी खाडीवरील दोन लेनचा पूल हा वाहतूकीसाठी अपुरा पडत होता. त्याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होती. ही कोंडी दूर करण्यासाठी खाडीवर सहा पदरी पूल तयार करण्यास मंजूरी देण्यात आली होती. या पूलाचे काम २०१६ रोजी सुरु करण्यात आले. मात्र नेमलेल्या कंत्रटदाराकडून संथगतीने काम सुरु असल्याने कंत्रटदाराकडून काम काढून घेण्यात आले. त्याठिकाणी टी अॅण्ड टी कंपनीला देण्यात आले. या कंपनीने कामाला गती दिली. मात्र २०१९ साली अतिवृष्टीचा कामाला फटका बसला. त्यापाठोपाठ २०२० मध्ये कोरोनाचा फटका बसला. अनेक अडचणीवर मात करीत या पूलाच्या दोन लेन पूर्णत्वास आल्या आहेत. या कामावर पालकमंत्री एकनाथ शिंदे जातीने लक्ष ठेवून होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या दोन लेन मार्गी लागल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले. दोन लेन खुल्या केल्याने अस्तित्वात असलेल्या जुन्या पूलाच्या दोन लेन आणि नव्या पूलाच्या दोन लेन अशा मिळून चार लेन वाहतूकीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सुरु असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी आमदार भोईर यांनी केली. यावेळी शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी सीएनजी पेट्राले पंपाच्या नजीक मागच्या पावसाळ्य़ात नाल्या नजीक रस्ता खचला असून त्याकडे महापालिकेचे प्रशासन लक्ष देत नाही. याठिकाणी वाहने नाल्यात पडून मोठी दुर्घटना होऊ शकते याकडे लक्ष वेधले आहे. नालेसफाईच्या कामातील त्रूटी कंत्रटदाराच्या लक्षात आणून देण्याकरीता हा पाहणी दौरा असून नालेसफाई चांगली व्हावी. कुठेही पावसाळ्य़ात पाणी तुंबू नये अशा सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.

Web Title: Dedication of two lanes of new bridge over Kalyan Durgadi creek on 31st May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.