केडीएमसीने राबविली ब आणि क प्रभागात डीप क्लिनिंग मोहिम
By मुरलीधर भवार | Published: January 12, 2024 05:02 PM2024-01-12T17:02:59+5:302024-01-12T17:03:17+5:30
महापालिकेने २०२३ मध्ये रात्रीच्या वेळी कचरा संकलन, क्यूआर कोडव्दारे जीव्हीपी निमुर्लन असे स्वच्छतेबाबत नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले
कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील ब आणि क प्रभागात आज डिप क्लिनिंग मोहीम राबविण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी शहर स्वच्छतेसाठी नागरीकांचा सहभाग आवश्यक असल्याचे आवाहन केले.
या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त चितळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त प्रसाद बोरकर, स्वच्छ भारत अभियानाचे महापालिकेचे ब्रँन्ड ॲम्बसिडर डॉ. प्रशांत पाटील, विभागप्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहाय्यक आयुक्त राजेश सावंत आणि तुषार सोनावणे आदी सहभागी झाले होते.
महापालिकेने २०२३ मध्ये रात्रीच्या वेळी कचरा संकलन, क्यूआर कोडव्दारे जीव्हीपी निमुर्लन असे स्वच्छतेबाबत नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले. स्वच्छतेबाबत महापालिका कर्मचारी अग्रशील राहिले ,याचे दृश्य परिणाम आता हळुहळु दिसू लागले. यामुळे स्वच्छ सर्वेक्षण मधे महापालिकेस पहिल्यांदा १ स्टार मानांकन मिळाले आहे, यापुढेही सर्व अधिकारी/कर्मचारी एकमताने व एकदिलाने काम करु आणि आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करु.उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यानुसार धुळ प्रतिबंधात्मक कारवाईकडे जास्त लक्ष पुरविण्यात येणार आहे. डीप क्लिनिंग मोहिमेत रस्ता स्वच्छ धुवून स्वच्छ केला आहे. स्वच्छतेसाठी या वर्षी १ स्टार मानांकन मिळाले तरी पुढच्या वर्षी ३ स्टार मानांकन मिळवण्याचा मानस अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.