आधारवाडी डंपिंगला लागलेल्या आगी प्रकरणी उपायुक्तांची खडकपाडा पोलिस ठाण्यास तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:42 PM2022-03-25T18:42:13+5:302022-03-25T18:42:35+5:30
Kalyan Dombivali: कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडला काल भीषण आग लागली होती. ही आग विझविण्यात आली आहे. या आगी प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी अशी तक्रार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.
कल्याण-कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडला काल भीषण आग लागली होती. ही आग विझविण्यात आली आहे. या आगी प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी अशी तक्रार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.
डंपिंगला 12 मार्च रोजी आग लागली होती. ही आग 14 मार्च रोजी अटोक्यात आली. डंपिंग ग्राऊंडवर पाणी मारण्याचे कंत्रट राहूल मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. आग लागू नये यासाठी डंपिंगवर पाणी मारण्याचे काम साठेनगरातील गुलाब जगताप यांनी घेतले आहे. मात्र जगताप याने डंपिंग ग्राऊंडवर बांधलेले बेकायदा शेड रेखा लाखे यांनी तोडली होती. रेखा लाखे यांना डंपिंगवरील कचरा वर्गीकरणाचे काम महापालिकेने दिले आहे. शेड तोडल्याच्या रागातूनच जगताप याने डंपिंगला आग लावली असावी असा संशय उपायुक्त कोकरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. कारण शेड तोडण्याची घटना 1क् मार्च रोजी घडली होती. याशिवाय सध्या अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे जाणूनबूजून आग लावली गेली असल्याची शक्यताही उपायुक्तांनी तक्रारीत म्हटले आहे. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपायुक्तांनी 15 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे केली होती. मात्र डंपिंगला काल 24 मार्च रोजीही पुन्हा भीषण आग लागली. या आगीचीही चौकशी केली जावे असे कोणतेही पत्र अद्याप पोलिसांना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे कालची आग डंपिंगला कोणी लावली असा प्रश्न आहे. पोलिसांनी अद्याप तरी 15 मार्चच्या तक्रार अर्जानुसार चौकशी केलेली नाही. आगीचा धूर मात्र काल नागरीकांच्या नाका तोंडात गेला होता.