कल्याण पूव्रेत लोकगायक आनंद शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 03:46 PM2020-12-10T15:46:30+5:302020-12-10T15:46:36+5:30

जलवाहिन्याच्या कामाला सुरुवात

Development work inaugurated by folk singer Anand Shinde in Kalyan | कल्याण पूव्रेत लोकगायक आनंद शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ

कल्याण पूव्रेत लोकगायक आनंद शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ

Next

कल्याण-कल्याण पूव्रेतील माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रभागात तीन ठिकाणी जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ लोकगीत गायक  आनंद शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला.आडीवली ढोकली परिसरातील ममतानगर, मल्हारनगर, जयभीमनगर,नेताजीनगर या परिसरात पाण्याची समस्या कायम होती. या समस्ये प्रकरणी महिलांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता.

पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पाटील यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचा शुभारंभ या परिसरात करण्यात आला. या प्रसंगी लोकगिताचे गायक शिंदे यांनी सांगितले की, मी कल्याणकर आहे. मला या ठिकाणी विकास काम होत असल्याचा आनंद आहे. त्यासाठी नगरसेवक पाटील यानी पाठपुरावा केला आहे.

विधानसभेवर मी जाणार आहे. त्याठिकाणी काय प्रश्न मांडणार याची वाच्यता मी आधीच करणार नाही. जो गरजते है, वो बरसते नाही. त्यामुळे काम हे कृतीतून करावे असे स्पष्ट केले. त्याचबरोबर सरकारने शक्ती कायदा मंजूर केला आहे. या कायद्यामुळे महिलांना बळ मिळणार आहे. महिला निर्धास्त होणार आहे. तसेच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे अभिनंदन शिंदे यांनी यावेळी केले. याशिवाय महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण पश्चिमेत उभारले आहे. ते शहराच्या बाहेर आहे. ते शहराच्या केंद्रस्थानी उभारण्याचा प्रयत्न करणार. हे स्मारक कल्याण पूव्रेत लवकरउभारले जाईल. त्याचा भूमीपूजन सोहळाही लवकर केला जाईल अशी घोषणाही गायक शिंदे यांनी यावेळी केली.

Web Title: Development work inaugurated by folk singer Anand Shinde in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.