कल्याणला जाण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती आहे का?; स्मार्ट सिटीच्या कामासाठी वाहतुकीत केला जाणार बदल

By मुरलीधर भवार | Published: January 3, 2024 08:28 PM2024-01-03T20:28:15+5:302024-01-03T20:28:24+5:30

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वल्लीपीर चौक ते महात्मा फुले चौका दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

Did you know this before going to Kalyan?; Changes to be made in transportation for smart city work | कल्याणला जाण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती आहे का?; स्मार्ट सिटीच्या कामासाठी वाहतुकीत केला जाणार बदल

कल्याणला जाण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती आहे का?; स्मार्ट सिटीच्या कामासाठी वाहतुकीत केला जाणार बदल

कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकासाचे काम सुरू आहे. या विकासकामाला गती देण्यासाठी रेल्वे आरक्षण केंद्र ते सार्वजनिक शौचालयापर्यंतचा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच, काही मार्गांवर एकेरी वाहतूक करून काही मार्गांवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी येत्या चार दिवसांत केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वल्लीपीर चौक ते महात्मा फुले चौका दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तसेच, एसटी डेपोच्या इमारतीचा पुनर्विकास केला जात आहे. त्याठिकाणी मल्टी मॉडेल पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. हे काम मार्गी लावण्याकरिता नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक वळविण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक पुष्कराज हॉटेल मोहमद अली चौक ते दीपक हॉटेल दरम्यान एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. दीपक हॉटेल येथून पुष्कराज हॉटेल, मोहमद अली चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दीपक हॉटेल येथे प्रवेश बंद करणार आहे. ही वाहने दीपक हॉटेल, एसटी स्टँड इनगेट ते गुरुदेव हॉटेलमार्गे इच्छित स्थळी जातील. महात्मा फुले चौकाकडून पुष्कराज हॉटेल मोहमद अली चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना महात्मा फुले चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

वाहने महात्मा फुले चौक, दीपक हॉटेल एसटी स्टँड इनगेट ते गुरुदेव मार्गे इछितस्थळी जातील. एसटी स्टँड इनगेट ते झुंजारराव मार्केट ते गुरुदेव हॉटेल दरम्यान एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. गुरुदेव हॉटेलकडून कल्याण स्टेशनकडे व झुंजारराव मार्केटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गुरुदेव हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने गुरुदेव हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज चौक पुष्कराज हॉटेल मोहमद अली चौक मार्गे मार्गे इच्छित स्थळी जातील अथवा झुंजारराव मार्केट येथे जाणारी वाहने डी मार्ट आर्चिज गॅलरी गल्ली मार्गे इच्छित स्थळी जातील.

आर्चिज गॅलरी - साधना हॉटेल नाना नानी पार्क मागील बाजू ते टेनिस कोर्ट केडीएमसी दरम्यान एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. सर्व वाहने कराची मेडिकल आर्चिज गॅलरी वल्लीपीर मार्गे जातील. महात्मा फुले चौक ते दीपक हॉटेल हा एक दिशा मार्ग रद्द करून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येत आहे. कल्याण स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी बसना महात्मा फुले चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सुभाष चौक येथून कल्याण स्टेशनकडे जाणारी अवजड वाहने ही प्रेम ऑटो सर्कलमार्गे जातील. तसेच, सर्व खासगी बस महात्मा फुले चौक येथे यू टर्न घेऊन सुभाष चौकमार्गे जातील.

Web Title: Did you know this before going to Kalyan?; Changes to be made in transportation for smart city work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण