कल्याणच्या काळा तलावात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By मुरलीधर भवार | Published: February 9, 2023 07:34 PM2023-02-09T19:34:41+5:302023-02-09T19:35:09+5:30

कल्याण पश्चिमेतील काळा तलाव येथे या प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्याक्षिके दाखविण्यात आली.

disaster management training in kalyan kala talav | कल्याणच्या काळा तलावात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

कल्याणच्या काळा तलावात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

googlenewsNext

कल्याण - आज कल्याण पश्चिमेतील काळा तलाव येथे या प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र - सखी स्वयंसेवक प्रशिक्षण सुरू आहे. संपूर्ण ठाणे जिल्हात ५०० स्वयंसेवकांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यापैकी ठाणे येथून १२२ तसेच अंबरनाथ तालुक्यातून १०५ स्वयंसेवकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. उप विभागीय अधिकारी, प्रांत कार्यालय कल्याण व तहसीलदार कल्याण तालुका यांच्या समन्वयाने कल्याण तालुक्यात ३० जानेवारी पासून उद्या १० फेब्रुवारी पर्यंत सुरू असून अचिवर्स महाविद्यालय येथे बॅच क्रमांक ५ आणि ६ मध्ये एकूण १२२ स्वयंसेवक प्रशिक्षण घेत आहेत.

या शिबिरात पोलीस पाटील, नागरी संरक्षण दल, एनसीसी आणि एनएसएस, होमगार्ड, अग्निशमन दल, निवृत्त सैनिक अशा सर्वांच सहभाग आहे. शिबिरात पूर परिस्थिती बुडणाऱ्या व्यक्तीचा बचाव करणे व बोट चालवणे, गर्दी व्यवस्थापन आणि दंगल परिस्थिती साठी स्व सुरक्षेसाठी शिल्डचा वापर आणि लाठी चालवणे, प्रथमोपचार - बँडेज करणे, अग्नी सुरक्षा उपकरणे हाताळणी व मानवी स्ट्रेचर, दोरीच्या साहाय्याने डोंगर कडा चढणे-उतरणे, गाठींचे प्रकार, भूकंप, दरड कोसळणे, इमारत कोसळणे दुर्घटना व इतर आणीबाणी परिस्थिती हाताळणे अशा विविध विषयांवर प्रशिक्षण आणि सराव करण्यात आला. हे प्रशिक्षण यशदाचे मास्टर ट्रेनर, पोलीस अधिकारी, अग्निशमन अधिकारी, नागरी संरक्षण दल, प्रख्यात गिर्यारोहक यांच्याकरवी देण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी उप जिल्हाअधिकारी अभिजीत भांडे पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार रीताली परदेशी व सुषमा बांगर तसेच ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ अनिता जावंजळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र सखी समन्वयक सुहास पवार, मैत्रेयी सापने, अभिजीत बाऊस्कर, कौशल पोतनीस, जयेश अहिरे, रोहित ठाकूर, यांनी मेहनत घेतली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: disaster management training in kalyan kala talav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण