नव्या कार्यकारिणीवरून राष्ट्रवादीत धुसफूस, नाराज कार्यकर्ते घेणार जयंत पाटलांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 15:45 IST2021-03-25T15:43:34+5:302021-03-25T15:45:20+5:30

नव्या कार्यकारिणीत डोंबिवलीतील सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहीलेल्या भाऊ पाटील यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

Disillusionment in NCP over new executive, Disgruntled activists will meet Jayant Patil | नव्या कार्यकारिणीवरून राष्ट्रवादीत धुसफूस, नाराज कार्यकर्ते घेणार जयंत पाटलांची भेट

नव्या कार्यकारिणीवरून राष्ट्रवादीत धुसफूस, नाराज कार्यकर्ते घेणार जयंत पाटलांची भेट

   
कल्यान/डोंबिवली - राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर झालीये. मात्र या नियुक्त्यांमध्ये सावळागोंधळ असल्याची चर्चा सध्या  सुरू आहे. यात कल्याण पश्चिमेला काहीसे झुकते माप देण्यात आल्याने डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच नाराज कार्यकर्ते  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडणार आहे. विशेष म्हणजे केडीएमसी निवडणूकी अगोदरच राष्ट्रवादीत नाराजी सत्र सुरू झालेय. (Disillusionment in NCP over new executive, Disgruntled activists will meet Jayant Patil)


नव्या कार्यकारिणीत डोंबिवलीतील सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहीलेल्या भाऊ पाटील यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. परंतू अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या पाटील यांना ते पद न मिळाल्याने ते नाराज झाले. पद वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहूनही त्यांनी कार्याध्यक्षपद नियुक्ती पत्रक स्वीकारण्यास उघडपणो नकार दिला. अध्यक्षपद देण्यात येईल, असा शब्द स्थानिक नेत्यांनी आपल्याला दिला होता परंतू तो न पाळल्यामुळे नाराज असल्याचे पाटील म्हणाले. तर कल्याण ग्रामीणमधील पदाधिकारी ब्रह्मा माळी यांनीदेखील  या नियुक्तीबद्दल फेरविचार करण्याची मागणी केली आहे.



 

Web Title: Disillusionment in NCP over new executive, Disgruntled activists will meet Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.