राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1 हजाराहून अधिक फुलझाडांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 02:07 PM2021-06-14T14:07:02+5:302021-06-14T14:07:17+5:30
नागरिकांचा प्रतिसाद पाहता तब्बल 1 हजार 53 फुलझाडांचे वाटप अवघ्या एका तासात झाले.
कल्याण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र डोंबिवलीतील कार्यक्रम हा सर्वांपेक्षा आगळावेगळा ठरला आहे .कल्याणचे आमदार राजु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवलीकर नागरीकांना विविध फुलझाडांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. नागरिकांचा प्रतिसाद पाहता तब्बल 1 हजार 53 फुलझाडांचे वाटप अवघ्या एका तासात झाले.
गेली दिड वर्ष कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण जग त्रासलेले असताना हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येऊन पुर्वीप्रमाणेच लोकांचे जीवन उत्साहाने भारलेले,टवटवीत,सुगंधी व रंगीबेरंगी व्हावे यासाठी गुलाब,मोगरा,जास्वंद अशी मनमोहक फुलझाडे वाटुन लोकांच्या जीवनात या दिवसानिमित्ताने चैतन्य जागृत होऊन नैराश्य व मरगळ दूर व्हावी तसेच या माध्यमातून झाडे लावा,झाडे जगवा हा सामाजिक संदेश घरोघरी जावा असा हेतू ठेवून सदर उपक्रम राबविल्याचे मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी सांगितले.या
उपक्रमासाठी मनसे शहरसंघटक योगेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महिलांनी देखील आग्रहानं आपल्या आवडीचे फुलझाड घेत या उपक्रमाला पाठींबा दिला. मात्र एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी।होत असताना राजकीय उपक्रमांमुळे रस्त्यावर गर्दी होताना दिसत आहे.