तब्बल तीन तास बरणी मध्ये अडकलेल्या श्वानाची पॉज कडून सुटका

By अनिकेत घमंडी | Published: May 23, 2024 11:20 AM2024-05-23T11:20:28+5:302024-05-23T11:22:04+5:30

नागरिकांचा पडला भांड्यात जीव

dog trapped in a jar for three hours was rescued |  तब्बल तीन तास बरणी मध्ये अडकलेल्या श्वानाची पॉज कडून सुटका

 तब्बल तीन तास बरणी मध्ये अडकलेल्या श्वानाची पॉज कडून सुटका

अनिकेत घमंडी, डोंबिवली : येथील एमआयडीसी मध्ये  एक भटक्या श्वानाच्या तोंडात प्लॅटिक ची बरणी अडकल्याचा प्रकार घडला. माजी नगरसेवक नंदू ठोसर ह्यांना स्थानिकांनी फोन करून मदत मागितली असता त्यांनी तात्काळ पॉज संस्था च्या हेल्पलाईन वर कॉल केला. तिथे निलेश भणगे ह्यांनी 20 मिनिटात स्टाफ अरेंज करून ताबडतोब पॉज संस्थेची रुग्णवाहिका पाठवली. 

पॉज संस्थेचे महेश साळुंखे ह्यांनी  त्वरित धाव घेऊन ह्या श्वानास कॅचर मध्ये पकडून , बरणी थोडी कापून त्या मुक्या जीवाचे प्राण वाचवले!
एमआयडीसी परिसरतील काही रहिवासी सकाळ पासून नंबर शोधत होते शेवटी नंदू ह्यांनी पॉज ह्या ठाणे जिह्यातील सर्वात जुन्या संस्थेला कॉल केला कारण त्या श्वानास 3 तासांनी गुद मरू लागले होते आणी त्याचा त्याचा जीव ह्यात गेला असता!

नागरिकांनी प्लास्टिक वापरणे सोडून द्यावं आणि प्लास्टिक रस्त्यावर फेकणे बंद करावे असे संस्थेच्या ट्रस्टी अनुराधा रामस्वामी ह्यांनी म्हटले.

प्रत्येक सोसायटी ने आपल्या परिसरात पशु पक्ष्यांसाठी मातीचे किंवा सिमेंट चे पाणी भरलेले भांडे ठेवावे असे निलेश भणगे ह्यांनी म्हटले

तीन वर्षांपूर्वी बदलापूर येथे गोरेपाडा येथे देखील एक बिबट्या चे पिल्लू असेच 3 दिवस जार मध्ये तोंड अडकून फिरत होते आणि 3 दिवसाच्या अथक प्रयत्न नंतर त्याला वाचवण्यासाठी पॉज आणि इतर संस्था आणि वनखात्याच्या यश आले होते.

Web Title: dog trapped in a jar for three hours was rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.