Dombivali: एक रात्र कवितेची उपक्रमाला ५२ कवींची उपस्थिती, एक से एक बहारदार कविता केल्या सादर

By अनिकेत घमंडी | Published: April 29, 2024 02:11 PM2024-04-29T14:11:43+5:302024-04-29T14:12:05+5:30

Dombivali News: काव्यरसिक मंडळ, डोंबिवली हे एक कवितेचे विद्यापीठ आहे. येथे कविते मागचे व्याकरण, दोन ओळीं मधला संवाद याचा उहापोह होतो, आणि उत्तम कवितांचे दर्शनही घडते. डोंबिवली शहराने जशी गुढीपाडव्याची शोभायात्रा प्रथम सुरू केली,

Dombivali: 52 poets were present in Ek Raat Kaveeti activity, one by one Bahardar poems were presented | Dombivali: एक रात्र कवितेची उपक्रमाला ५२ कवींची उपस्थिती, एक से एक बहारदार कविता केल्या सादर

Dombivali: एक रात्र कवितेची उपक्रमाला ५२ कवींची उपस्थिती, एक से एक बहारदार कविता केल्या सादर

- अनिकेत घमंडी 
डोंबिवली - काव्यरसिक मंडळ, डोंबिवली हे एक कवितेचे विद्यापीठ आहे. येथे कविते मागचे व्याकरण, दोन ओळीं मधला संवाद याचा उहापोह होतो, आणि उत्तम कवितांचे दर्शनही घडते. डोंबिवली शहराने जशी गुढीपाडव्याची शोभायात्रा प्रथम सुरू केली, त्याचप्रमाणे काव्यरसिक मंडळ, डोंबिवली यांनी एक रात्र कवितेची हा कवितेचा जागरही डोंबिवलीत प्रथम सुरू केला. आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया कवींनी व्यक्त।केली. निमित्त होते एक रात्र कवितेची हा कार्यक्रम झाला त्याला तब्बल ५२ कवींनी नावे नोंदविली होती. त्यात नासिक मुंबई नवी मुंबई भाईंदर पासून कवी उपस्थित होते.

कार्यक्रमाला अध्यक्ष, आघाडीचे कवी लेखक किरण येले आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य, आणि सावंतवाडीचा मालवणी चेहरा दादा मडकईकर हे लाभले होते. संस्थेच्या सचिव दयाताई घोंगे, यांनी सुरुवातीचे सूत्रसंचालन केले. दीप प्रज्वलनानंतर अध्यक्षा उज्ज्वला लुकतुके यांच्या हस्ते अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार झाला. येले यांची ओळख करून देताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक कवी संवेदनशील असतोच पण ही संवेदना जेव्हा त्यांच्या कृतीत दिसते तेव्हाच, ह्या हृदयीचे बोल त्या हृदयापर्यंत पोहोचतात. येले हे याच प्रकारातले साहित्यिक आहेत. त्यांनी कोरोना काळात स्वतः झाडे लावून, उद्यान तयार केले आणि प्राथमिक शाळेतील मुलांशी संवाद साधून त्यांना दिशा दाखवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर येले यांनी आम्ही चिल्लर सुटे पैसे भुक्कड, तुम्ही बंद नोटा फक्कड, बाई नखे वाढवते पण आयुष्यभर फक्त रंगवत राहते, तसेच 'सीतेने खूप पत्रे लिहिली होती भूर्जपत्रांवर, अग्नी परीक्षेच्या आदल्या रात्री वगैरे कविता वाचून रसिकांची वाहवा मिळवली. दुसऱ्या फेरीला सुरुवात करताना, जयंत कुलकर्णी यांनी मै तो अकेले मजे मे था, मुझे आप किस लिये मिल गये? या मजरहू सुलतानपुरी यांच्या शेराने, श्रेष्ठ गजलकार श्री. प्रशांत वैद्य या आमंत्रित पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यांच्या सगळ्या गझल खूप भाव खाऊन गेल्या. जुने किती अन नवे किती, या शहराला तडे किती? सांग उजेडा तुझ्या मध्ये, सूर्य किती काजवे किती? तसेच "मनात माझे नाव तुझ्या पण अधरी नाही. तुझ्या एवढा पाऊस सुद्धा लहरी नाही" वगैरे अप्रतिम गझल सादर केल्या.

यानंतर कवींनी दुसऱ्या कवींच्या कविता वाचायच्या होत्या. ही फेरी अत्यंत बहारदार होती. त्यानंतर पाहुणे कवी दादा मडकाईकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी फेरी रंगली. आनंद पेंढारकर यांनी त्यांचा परिचय करून देताना स्वतःच्या मालवणी कवितांना क्लासिकल गाण्याच्या चाली लावून म्हणणे आणि फड जिंकणे, हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित केले तसेच त्यांनी मालवणी शब्द आणि म्हणी संकलित केल्या आहेत वगैरे माहिती दिली. दादा मडकईकर यांनी "पळस फुललो रानात, पळस फुललो मनात!... चांदण्याची फुला खोल खोल दरीत गो".. वगैरे कविता म्हणून रसिकांची मने जिंकली. नाशिकहून आलेले श्री नंदन रहाणे यांची गवळण, अध्यक्षा उज्वला लुकतुके यांची बहिणाबाई वरील कविता, निशा काळे यांची 'भय', मृणाल केळकर यांची चाल लावून सादर केलेली महानोर यांची कविता. यांनी।केल्या।कविता सादर...

याचबरोबर मेघना पाध्ये, विजय जोशी, आनंद पेंढारकर, हेमंत राजाराम, जयंत कुलकर्णी, महेश देशपांडे, कल्याणचे योगेश वैद्य, दया घोंगे, विजय बेंबाळकर, अंजली बापट, मगदूम मॅडम, मेघना पाटील, सानिका गोडसे, वैदेही जोशी, प्रज्ञा कुलकर्णी, स्वाती भाट्ये, संदीप मर्ढेकर, वर्षा पाटील, संगीता पाखले, वैभव वऱ्हाडी, जितेंद्र लाड विशाल राजगुरू, राजेश देवरुखकर, सुधीर चित्ते, मनोज मेहता, पंकज जावळेकर, संदीप कळंबे,भाईंदरचे नमाई, रवींद्र सोनावणे, कल्पना गवरे, सखाराम आचरेकर, नागेश नायडू, विलास वाव्हळ, रवींद्र पाटील, हर्षल आचरेकर, अश्विनी म्हात्रे, प्रमोद पाटील, राजेश देवरुखकर, सखाराम आचरेकर, सुरेखा मालवणकर, नागेश नायडू, रवींद्र पाटील, संदीप कळंबे आदींमुळे कार्यक्रम संपन्न झाला.

Web Title: Dombivali: 52 poets were present in Ek Raat Kaveeti activity, one by one Bahardar poems were presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.