डोंबिवली: स्व. दादा चोळकर स्मृती व्याख्यान संपन्न; प्रा. शामकांत अत्रेंनी सांगितल्या आठवणी

By अनिकेत घमंडी | Published: July 1, 2024 02:20 PM2024-07-01T14:20:21+5:302024-07-01T14:24:02+5:30

सर्वेपी सुखीनः सन्तु उक्तीप्रमाणे सर्वांच्या ईच्छा, आरोग्य चांगल्या असोत, कोणालाही दुःख नसावे : शाम अत्रे

Dombivali Dada Cholkar Memorial Lecture concluded | डोंबिवली: स्व. दादा चोळकर स्मृती व्याख्यान संपन्न; प्रा. शामकांत अत्रेंनी सांगितल्या आठवणी

डोंबिवली: स्व. दादा चोळकर स्मृती व्याख्यान संपन्न; प्रा. शामकांत अत्रेंनी सांगितल्या आठवणी

डोंबिवली: भारतीय समाजव्यवस्था कशी आहे, वर्ण हे जन्मावर आधारित नसून कर्मावर आधारित कसे आहेत, आपल्या कर्तृत्वाने प्रगती कशी करता येते, भारतीय मुल्ये कोणती, भारतीय संस्कृतीचे ध्येय कसे असावे तर सर्वेपी सुखीनः सन्तु... या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सर्व जण सुखी व्हावेत, सर्वांचे आरोग्य उत्तम असावे, सर्वांच्या ईच्छा चांगल्या असोत, कुणालाही दु:ख भोगायला लागू नये अशी समाजव्यवस्था उभी करणे आपले ध्येय असावे. तशा मार्गावर आपण चालावे. असे प्रतिपादन प्रा. शामकांत अत्रे यांनी।केले. सहजीवन सेवा मंडळ कल्याणच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संघप्रचारक स्व. दादा चोळकर यांच्या स्मृतीदिनाचे निमित्तानेयांचे स्वातंत्र्योत्तर भारतातील सामाजिक स्थाती या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी अत्रे वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. आनंदी गोपाळ सभागृहात झालेल्या त्या कार्यक्रमात प्रास्ताविक करतांना अध्यक्ष मधुकर फडके यांनी स्व. दादांच्या काही आठवणी सांगितल्या. याच कार्यक्रमात १०वी, १२वी, व पदवी परिक्षेत उत्तम यश मिळविलेल्या स्वयंसेवकांचा तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी फडके, स्नेहल करमरकर, मंजिरी फडके, श्रिधर कुलकर्णी व दिगंबर फडणीस यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात वैयक्तिक गीत हे विवेक रानडे यांनी गायले व सूत्रसंचालन प्रसाद मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, विश्वास सहस्रबुद्धे, विकास गोखले, वैभवराज रिसबुड यांनी मेहनत घेतल्याचे मंडळाचे प्रविण देशमुख म्हणाले.
 

Web Title: Dombivali Dada Cholkar Memorial Lecture concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.