Dombivali: सुशील कनौजिया झाला सैनिक, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा 

By अनिकेत घमंडी | Published: July 11, 2024 03:34 PM2024-07-11T15:34:16+5:302024-07-11T15:35:18+5:30

Dombivali News: डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीचा प्रशिक्षणार्थी जवान सुशील कनोजिया हा सेंट्रल इंडस्ट्री सिक्युरिटी फोर्स मध्ये भरती झाला असून ओरिसा येथे आपले कर्तव्यावर रुजू झाला, हे सांगण्यास अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त।केली.

Dombivali: Sushil Kanaujia became a soldier, Minister Ravindra Chavan congratulated  | Dombivali: सुशील कनौजिया झाला सैनिक, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा 

Dombivali: सुशील कनौजिया झाला सैनिक, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा 

- अनिकेत घमंडी

डोंबिवली - डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीचा प्रशिक्षणार्थी जवान सुशील कनोजिया हा सेंट्रल इंडस्ट्री सिक्युरिटी फोर्स मध्ये भरती झाला असून ओरिसा येथे आपले कर्तव्यावर रुजू झाला, हे सांगण्यास अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

वर्दीत राहून करियर घडावं हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या डोंबिवली परिसरातील देशभक्त युवकांसाठी डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीची स्थापना केल्याचे चव्हाण म्हणाले. सुशील सारखा होतकरू तरुण या अकॅडमीतून प्रशिक्षण घेऊन सीआयएसएफमध्ये भरती झाला आणि खडतर प्रशिक्षण घेऊन कर्तव्यावर रुजू देखील झाला. त्यामुळे या अकॅडमीचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला आहे, असंच म्हणावं लागेल. सातत्य, जिद्द, चिकाटी आणि ध्येयासक्ती या गुणांच्या बळावर सुशीलने हे ध्येय गाठले आहे. तसेच अकॅडमीतील प्रशिक्षक एस. शेख , प्रवीण भास्कर मेस्त्री यांच्यासारख्या अनुभवी प्रशिक्षकांचा देखील यात सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. सुशील आम्हाला तुझा अभिमान आहे. देशाच्या सेवेत दैदीप्यमान कामगिरी करून तू आपल्या डोंबिवलीचे नाव मोठे करावेस, यासाठी तुझे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.  

Web Title: Dombivali: Sushil Kanaujia became a soldier, Minister Ravindra Chavan congratulated 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.