इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप परिक्षकपदी डोंबिवलीपुत्र योगेश पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 10:05 PM2022-11-11T22:05:29+5:302022-11-11T22:06:15+5:30

या स्पर्धेचे पहिले दोन सीजन 2018 दुबई व 2019 थायलंड या दोन्ही सीझनमध्ये डोंबिवलीच्या पेसमेकर्स डान्स अकॅडमीने बाजी मारली होती

Dombivaliputra Yogesh Patkar as examiner of International Dance Championship | इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप परिक्षकपदी डोंबिवलीपुत्र योगेश पाटकर

इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप परिक्षकपदी डोंबिवलीपुत्र योगेश पाटकर

Next

इंडियाज  इंटरनॅशनल Groove Fest (IIGF) २०२२  इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा नुकतीच थायलंडमध्ये पटाया या शहरात  नोव्हेंबरला पार पडली. ही स्पर्धा पदन्यास एंटरटेनमेंटने आयोजित केली होती. या स्पर्धेत भारतातूनच नव्हे तर दीडशेहून अधिक स्पर्धक इतर देशातूनही आले होते. या स्पर्धेसाठी डोंबिवलीपुत्र आणि सेलिब्रिटी कोरिओग्राफर योगेश पाटकर यांची निवड करण्यात आली. त्यामुळे, डोंबिवलीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. 

या स्पर्धेचे पहिले दोन सीजन 2018 दुबई व 2019 थायलंड या दोन्ही सीझनमध्ये डोंबिवलीच्या पेसमेकर्स डान्स अकॅडमीने बाजी मारली होती. या स्पर्धेच्य 2022 च्या चौथ्या सीझनमध्ये  याच पेसमेकर्स संस्थेचे डिरेक्टर व बॉलीवूड सेलिब्रिटी कोरिओग्राफर योगेश पाटकर यांची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध कथ्थक विशारद  कुमार शर्मा व बॉलीवूडचे कोरिओग्राफर मास्टर रुयल यांची नेमणूक करण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक, चषक व तीन लाख रुपये "नाद साद" या गुजरातच्या ग्रुपने पटकावले. या कार्यक्रमाची मुख्य आयोजक मेघा संपत किनी हिने केले होते.

Web Title: Dombivaliputra Yogesh Patkar as examiner of International Dance Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.