Dombivli: डोंबिवलीत घडले दुर्मिळ पांढर्या घुबडाचे दर्शन
By मुरलीधर भवार | Updated: October 12, 2024 16:32 IST2024-10-12T16:30:56+5:302024-10-12T16:32:09+5:30
Dombivli News: एमआयडीसी निवासी भागात एम्स रुग्णालयाजवळ शिवप्रतिमा मित्र मंडळ क्रीडांगणावर बंगाली कल्पतरु असोशिएशनकडून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. काल शुक्रवारी पूजन सुरु असताना नवरात्र उत्सवाच्या आवारात बांबूवर एक दुर्मिळ पांढर्या रंगाचे घुबड बसलेले आढळून आले.

Dombivli: डोंबिवलीत घडले दुर्मिळ पांढर्या घुबडाचे दर्शन
- मुरलीधर भवार
डोंबिवली - डोंबिवलीत पांढर्या घुबडाचे दर्शन घडले आहे. एमआयडीसी निवासी भागात एम्स रुग्णालयाजवळ शिवप्रतिमा मित्र मंडळ क्रीडांगणावर बंगाली कल्पतरु असोशिएशनकडून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. काल शुक्रवारी पूजन सुरु असताना नवरात्र उत्सवाच्या आवारात बांबूवर एक दुर्मिळ पांढर्या रंगाचे घुबड बसलेले आढळून आले. देवीचा आरती सुरु असताना घुबड बराच वेळ मंडपाच्या बांबूवर बसून होते. पांढरे घुबड हे लक्ष्मीदेवीचे वाहन म्हणुन मानले जाते. त्याचे दर्शन दुर्गाभक्तांना झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.