डोंबिवलीत डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भर पावसात निघाली रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 20:29 IST2024-05-16T20:29:23+5:302024-05-16T20:29:40+5:30
पाऊस पडत असूनही ना रॅली थांबली, ना मुख्यमंत्री रथावरून उतरले.

डोंबिवलीत डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भर पावसात निघाली रॅली
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी डोंबिवलीत आले होते. नांदीवलीच्या स्वामी समर्थ चौकातून रॅलीला सुरुवात होताच पावसाने हजेरी लावत जणूकाही आपणही महायुतीच्या पाठीशी असल्याचा संकेत दिला. मात्र पाऊस पडत असूनही रॅली थांबली नाही, ना मुख्यमंत्री रथावरून उतरले.
भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीत सहभागी झाले असून त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री संजय बनसोडे, संजय राठोड, माववळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महायुतीचे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधताना इतका पाऊस पडत असूनही आपण रॅलीत सहभागी झाले असून त्यामुळे कल्याण लोकसभा यंदा नक्कीच सगळे रेकॉर्ड तोडणार, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.