महानगर पाईप गॅसमधून गळती, नागरिकांमध्ये घबराहट, MIDC निवासी भागातील घटना

By अनिकेत घमंडी | Published: February 10, 2024 01:53 PM2024-02-10T13:53:29+5:302024-02-10T13:57:39+5:30

गॅस लाईन शनिवारी दुपारी साडे बारा वाजता तुटल्याने मोठी गळती

Dombivli Leakage from Mahanagar pipe gas, panic among citizens, incident in MIDC residential area | महानगर पाईप गॅसमधून गळती, नागरिकांमध्ये घबराहट, MIDC निवासी भागातील घटना

महानगर पाईप गॅसमधून गळती, नागरिकांमध्ये घबराहट, MIDC निवासी भागातील घटना

अनिकेत घमंडी, डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रोडवर साद सोसायटी जवळ महानगर गॅस लाईन रस्ते कामाचा वेळी शनिवारी दुपारी साडे बारा वाजता तुटल्याने मोठी गळती झाल्याने नागरिक घाबरले.

या संदर्भात दक्ष नागरिकांनी प्रसंगावधान राखून महानगर गॅस कंपनीला अपघाताची माहिती दिल्याचे रहिवाशी राजू नलावडे यांनी सांगितले. त्यानुसार घटनेची माहिती मिळताच महानगर गॅस कंपनीची इमर्जन्सी जीप येऊन कर्मचाऱ्यांनी तात्काळ गळती थांबवली आहे. या घटनेमुळे सुदर्शननगर आसपास भागात गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे.  महानगर तर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून होणार असून सायंकाळ पर्यंत पाईप गॅस पुरवठा सुरळीत सुरू होईल. असे तेथे उपस्थित महानगर गॅस कंपनीचा अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Dombivli Leakage from Mahanagar pipe gas, panic among citizens, incident in MIDC residential area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.