श्री गणेश मंदीरातील दिपोत्सवास डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद, महिला भक्तांनी केले सुक्त पठण
By अनिकेत घमंडी | Published: November 7, 2022 09:58 PM2022-11-07T21:58:20+5:302022-11-07T22:01:37+5:30
मंदीराचा गाभारा आणि बाहेरचा परीसर साधारणपणे २००० पणत्यांनी उजळून निघाला होता.
डोंबिवली: येथील श्री गणेश मंदीर संस्थानाने गणेश मंदीरात त्रिपूरी पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या दिपोत्सवास डोंबिवलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. मंदीराचा गाभारा आणि बाहेरचा परीसर साधारणपणे २००० पणत्यांनी उजळून निघाला होता. सोबत १५० ते २०० महिलांचे सुक्त पठण सुरू होते.
दिपोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली यांच्यावतीने खाद्यतेल दानयज्ञ या उपक्रमा अंतर्गत साधारणपणे १००० लिटर खाद्यतेल डोंबिवलिकरांनी दान केले. हे तेल आसपासच्या परीसरातील वृध्दाश्रम, वसतीगृहे आणि मतीमंद मुलांच्या शाळांना वाटण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष शैलेश गुप्ते आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या अध्यक्षा शुभांगी काळे यांनी समस्त डोंबिवलीकरांचे खाद्यतेल दानयज्ञाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानले.