वांगणीच्या डॉक्टर गुप्ता यांना ठोकल्या बेड्या, विनापरवानगी चालवत होता कोविड रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:39 AM2021-05-12T07:39:35+5:302021-05-12T07:41:03+5:30
होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत असल्याचे ते सांगायचे. याबाबत त्याने ९९ टक्के इन्फेक्शन असलेले रुग्ण दोन दिवसांत बरे केल्याचे दावे करणारे काही व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले होते.
अंबरनाथ : कोरोना रुग्णांना दोन दिवसांत बरे करण्याचे दावे करणाऱ्या वांगणीच्या डॉ. उमाशंकर गुप्ता यांना अखेर पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. या डॉक्टरने स्वतःचे अनेक व्हिडीओ व्हायरल केले होते. विनापरवानगी कोविड रुग्णालय चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत असल्याचे ते सांगायचे. याबाबत त्याने ९९ टक्के इन्फेक्शन असलेले रुग्ण दोन दिवसांत बरे केल्याचे दावे करणारे काही व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले होते. या व्हिडीओची दखल घेत अंबरनाथचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बनसोडे यांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुप्ता यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. परवानगीशिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करणे तसेच मास्क घालायला मज्जाव करणे, असे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
परवानगीशिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करणे तसेच मास्क घालायला मज्जाव करणे, असे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.