ड्रेनजेच काम निकष्ट दर्जाचे, मनसेकडून डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात आंदोलन

By मुरलीधर भवार | Published: November 30, 2023 03:45 PM2023-11-30T15:45:35+5:302023-11-30T15:46:15+5:30

ठेकेदारांकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

Drainage work criteria status, protest by MNS in Dombivli MIDC office | ड्रेनजेच काम निकष्ट दर्जाचे, मनसेकडून डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात आंदोलन

ड्रेनजेच काम निकष्ट दर्जाचे, मनसेकडून डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात आंदोलन

कल्याण- नेवाळी ते अंबरनाथ रस्त्याच्या बाजूला सुरु असलेल्या नाल्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार वारंवार करुन देखील दुर्लक्ष केले जात आहे. मनसेने देखील या संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतू अधिकारी निर्ढावलेले आहेत. त्यामुळे अंबरनाथ शहराचे मनसे उपशहर प्रमुख असामउद्दीन खान यांच्याकडून अनोखे आंदोलन डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात करण्यात आले. ठेकेदारांकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

अंबरनाथ काटई रस्त्यावर नेवाळी ते अंबरनाथ रस्त्याच्या बाजूला ड्रेनेजचे एक काम सुरु आहे. या ड्रेनेजच्या कामात निष्काळजीपमा केला जात आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरु आहे असा आरोप मनसेकडून करण्यात आला. यासंदर्भात मनसे उपशहर प्रमुख असामुद्दीन उर्फ बबलू खान यांनी एमआयडीसी अधिकाऱ्याला कळविले. खान यांचे म्हणणे आहे की, अधिकाऱ्यांनी जागेवर पाहिले पाहिजे की काम कसे केले जात आहे. ज्या कामात लोखंडी दोन सळई वापरल्या पाहिजे. त्याठिकाणी लोखंडी एक सळई वापरली जात आहे. आत्ता आवकाळी पाऊस झाला. त्या अवकाळी पावसात या कामाची काय परिस्थिती आहे. 

वारंवार तक्रार करुन देखील अधिकारी लक्ष देत नसल्याने असामुद्दीन खान आणि संदीप भोईर यांच्या नेतृत्वात मनसेकडून डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात आंदोलन केले गेले. हातात ब’नर घेऊन एमआयडीसीचा निषेध व्यक्त करण्यात आला. या कामाची तक्रार खान यांनी केल्याने त्यांना ठेकेदाराने धमकाविले असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. मनसेच्या आंदोलनानंतर एमआयडीसी जागी होणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

यासंदर्भात एमआयडीसीचे अभियंता आनंद गोगटे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सुरुवातील कामात निष्काळजीपणा होता. त्यानंतर कंत्राटदाराला नोटिस बजावली हौती. व्हीजेटीआय अहवाल मागविला होता. त्याने तो अहवाल सादर केला आहे. त्यानुसार त्याठिकाणी काम सुरु आहे.

Web Title: Drainage work criteria status, protest by MNS in Dombivli MIDC office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.