साकेत महाविद्यालयात अंमली पदार्थ जनजागृती
By सचिन सागरे | Published: June 26, 2024 03:55 PM2024-06-26T15:55:04+5:302024-06-26T15:55:25+5:30
अमली पदार्थ विरोधी सप्ताह महाविद्यालयामध्ये संपन्न झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : पूर्वेकडील साकेत कनिष्ठ महाविद्यालय व कोळशेवाडी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ विरोधी सप्ताह महाविद्यालयामध्ये संपन्न झाला.
‘संत संगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो' या ओवीनुसार विद्यार्थ्यांचे आचरण असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी पियर प्रेशरच्या आहारी जाऊ नये, डार्क वेबचा वापर करू नये असे आवाहन कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात कोणी ड्रग्स विक्री व सेवन करत असेल तर ११२ वर कॉल करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले.
या कार्यक्रमाला कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिगंबर पवार, साकेत शिक्षण संस्थेचा सदस्य डॉ. हेमा तिवारी, सीईओ शोभा नायर, उपप्राचार्य डॉ. प्रसिना बिजू, पिवली भट्टाचार्य यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. संजय चौधरी यांनी केले.