७० हजारांची लाच घेताना औषध निरीक्षकास अटक; दुकानाच्या परवान्यासाठी मागितले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:19 AM2024-07-10T10:19:54+5:302024-07-10T10:22:11+5:30

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे.

Drug inspector arrested for accepting bribe of 70 thousand | ७० हजारांची लाच घेताना औषध निरीक्षकास अटक; दुकानाच्या परवान्यासाठी मागितले पैसे

७० हजारांची लाच घेताना औषध निरीक्षकास अटक; दुकानाच्या परवान्यासाठी मागितले पैसे

कल्याण : मेडिकल दुकानदाराला दुकान सुरू करण्यासाठी परवाना देण्याच्या बदल्यात ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना औषध निरीक्षक संदीप नारायण नरवणे याला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. नरवणे याचा साथीदार सुनील चौधरी यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याणच्या तरुणाला मेडिकलचे दुकान सुरू करायचे होते. त्यांनी अन्न व औषध विभागाकडे तसा अर्ज केला होता. परवाना देण्याच्या बदल्यात औषध निरीक्षक नरवणे याने एक लाख रुपयांची मागणी केली होती. एक लाख रुपये दिले तरच परवाना दिला जाईल, असे सांगितले. अखेर तडजोड करून नरवणे यांनी ७० हजार रुपये घेण्याचे कबूल केले.

दोघांविरोधात गुन्हा याप्रकरणी तक्रारदाराने नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील डीमार्टजवळ सापळा रचला. त्या ठिकाणी तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी नरवणे व त्याचा साथीदार सुनील पोहोचले. लाच स्वीकारता दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी नवरणे याच्यासह त्याचा साथीदार चौधरी या दोघांविरोधात महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Drug inspector arrested for accepting bribe of 70 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.