लालचौकीतील सिग्नल रात्रीतच झाला सुरू, बिल न भरल्याने महावितरणने केली होती कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 06:00 PM2021-08-06T18:00:16+5:302021-08-06T18:00:59+5:30

बिल भरलं नाही म्हणून कल्याण पश्चिमेतील लालचौकी  येथील सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा प्रकार काही जागरूक नागरीकांनी उघडकीस आणला.

Due to non-payment of the bill, the power supply to the signal system at Lalchowki in Kalyan West was cut off, some conscious citizens revealed. | लालचौकीतील सिग्नल रात्रीतच झाला सुरू, बिल न भरल्याने महावितरणने केली होती कारवाई

लालचौकीतील सिग्नल रात्रीतच झाला सुरू, बिल न भरल्याने महावितरणने केली होती कारवाई

Next
ठळक मुद्देकेडीएमसी प्रशासनाने तातडीने सूत्र हलवत महावितरणशी संपर्क साधला आणि त्यानंतर गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला.

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमीच नागरीकांना थकीत कर भरण्याचे आवाहन करत असते. मात्र, आता खुद्द केडीएमसीने वीज बिल थकीत ठेवलं असल्याची बाब पुढे आली आहे. बिल भरलं नाही म्हणून केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची वीजपुरवठा खंडित करत महावितरणाने केडीएमसीला शॉक दिला. बिल न भरल्याच्या कारणास्तव खंडीत करण्यात आलेला सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा महावितरणकडून रात्रीलाच पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे आज सकाळपासून इथली सिग्नल यंत्रणा पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे. 

बिल भरलं नाही म्हणून कल्याण पश्चिमेतील लालचौकी  येथील सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा प्रकार काही जागरूक नागरीकांनी उघडकीस आणला. केडीएमसी प्रशासनाने तातडीने सूत्र हलवत महावितरणशी संपर्क साधला आणि त्यानंतर गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला. लालचौकी येथील सिग्नलचे 136 दिवसांचे 11 हजारांचे बिल पालिकेकडे थकीत होते. शुक्रवारी सकाळपासून सिग्नल यंत्रणा पून्हा सुरू झाल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
 

Web Title: Due to non-payment of the bill, the power supply to the signal system at Lalchowki in Kalyan West was cut off, some conscious citizens revealed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.