आदित्य ठाकरेंच्या डोंबिवली दौऱ्यादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का, शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकारी शिंदे गटात
By अनिकेत घमंडी | Published: April 30, 2024 03:14 PM2024-04-30T15:14:29+5:302024-04-30T15:19:51+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: आज आदित्य ठाकरे यांचा डोंबिवली दौरा आटोपतो न आटोपतो तोच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट हे शिवसेनेचे दोन ग आमने सामने येणार आहेत. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी आव्हान उभे केले आहे. दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांचा डोंबिवली दौरा आटोपतो न आटोपतो तोच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला हा धक्का दिला आहे. ठाकरे गटातील हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
ठाकरे गटातून शिंदे गटापक्ष प्रवेश करणा-यांची नावे पुढील प्रमाणे
विवेक खामकर -शहरप्रमुख
कवीता गावंड - महिला जिल्हासंघटक
लीना शिर्के - युवती सेना जिल्हाधिकारी
किरण मोंडकर - उपशहर संघटक
राधिका गुप्ते - कल्याण पूर्व विधानसभा संघटक
राजेंद्र नांदुस्कर -उपशहर संघटक
श्याम चौगुले -विभाग प्रमुख
सुधीर पवार -विभाग प्रमुख
शिवराम हळदणकर -विभाग प्रमुख
नरेंद्र खाडे -उपविभाग प्रमुख
सतीश कुलकर्णी -उपविभाग प्रमुख
प्रशांत शिंदे -उपविभाग प्रमुख
प्रसाद चव्हाण -शाखाप्रमुख
विष्णू पवार -शाखाप्रमुख
मयूर जाधव -शाखाप्रमुख