मेगाब्लॉकदरम्यान ठाणे-कल्याण जलद मार्गावरील १२० भंगार रूळ उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 11:26 PM2020-11-12T23:26:07+5:302020-11-12T23:26:21+5:30

४० एमबीसी स्लीपर बदलले, ५०० गोण्यांमध्ये भरली घाण

During the megablock, 120 scrap rails were lifted on Thane-Kalyan expressway | मेगाब्लॉकदरम्यान ठाणे-कल्याण जलद मार्गावरील १२० भंगार रूळ उचलले

मेगाब्लॉकदरम्यान ठाणे-कल्याण जलद मार्गावरील १२० भंगार रूळ उचलले

Next

डाेंबिवली :  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवारी मेगाब्लॉकदरम्यान ठाणे-कल्याण अप व डाउन जलद मार्गांवर आणि कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीची कामे केली. स्विच, टर्नआउट स्लीपर, ४० एमबीसी स्लीपर बदलण्यात आले. सहा क्रॉसिंग आणि फिशप्लेट सांध्याचे वंगण, ४३० मीटर लांबीच्या साइड ड्रेनेजची सफाई करण्यात आली. तसेच ५०० गोण्यांमध्ये घाण व कचरा भरण्यात आला. अभियांत्रिकी विभागामार्फत १२० भंगार रूळ उचलण्यात व लोडिंग करण्यात आले. ८८० मीटरच्या रुळांच्या नूतनीकरणाच्या माध्यमातून, १६ ठिकाणी वेल्डिंग, २०० मीटर युनिमॅट मशीनद्वारे टेम्पिंग इत्यादी कामे अभियांत्रिकी विभागाद्वारे करण्यात आली.

१.२ किमी लांबीच्या ओएचईचे वार्षिक ओव्हरहॉलिंग, ३.४ किमी लांबीच्या ओएचईची बारकाईने तपासणी, संपर्क वायरचे रिस्ट्रेस, १५ गंजलेले ब्रॅकेट बदलणे, ३२ अर्थ फास्टनर्स, आठ ब्रॅकेट असेंब्ली, १२ स्पॅन लांबीच्या ड्रॉपर्सची तरतूद, २१० मीटर संपर्क वायर बदलणे, २८ ठिकाणी वृक्षछाटणी; ५८ बॉण्ड्सचे डिस्कनेक्ट आणि पुन्हा जोडणे, ३५ बॉण्ड्सची तरतूद, नऊ गंजलेले व ऑफलोड केलेल्या मास्ट्सचे निराकरण; ही कामे पाच टॉवर वॅगन आणि तीन शिड्यांच्या गँगसह करण्यात आली.

Web Title: During the megablock, 120 scrap rails were lifted on Thane-Kalyan expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.