दसरा मेळावा ही संस्कृती शिवसेनेचीच- महेश तपासे

By मुरलीधर भवार | Published: September 24, 2022 06:44 PM2022-09-24T18:44:42+5:302022-09-24T18:45:05+5:30

वास्तविक महाराष्ट्रात झालेल्या शिंदे फडणवीचा सरकार यांच्या संदर्भात कायदेशीर पेच निर्माण झालेले आहेत.

Dussehra gathering is the culture of Shiv Sena; NCP Spokesperson Mahesh Tapase | दसरा मेळावा ही संस्कृती शिवसेनेचीच- महेश तपासे

दसरा मेळावा ही संस्कृती शिवसेनेचीच- महेश तपासे

Next

कल्याण- न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी दिली . न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादीने देखील समाधान व्यक्त केलं .याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्याचे परवानगी दिली आहे. त्या परवानगीचे स्वागत राष्ट्रवादीने देखील केले आहे.शिवसेनेची चाळीस वर्षापासून दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे ,ही परंपरा बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे नेतायत याचा आनंद आहे असे तपासे यांनी सांगितले.

दसरा मेळावा फक्त शिवसेनाच नाही तर राज्यातले सर्वच पक्षातले कार्यकर्ते आणि नेते दसरा मेळावा हे ऐकत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना मिळालेली परवानगी ही योग्यच आहे. वास्तविक महाराष्ट्रात झालेल्या शिंदे फडणवीचा सरकार यांच्या संदर्भात कायदेशीर पेच निर्माण झालेले आहेत. त्याच्यावर कायद्याने त्याला शिक्कामोर्तब झालेलं नाही कदाचित उद्याच्या २७ तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यादृष्टीने येण्याची शक्यता आहे .परंतु कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला संभ्रमांमध्ये टाकण्यासाठी शिंदे गटाच्या माध्यमातून देखील बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळाव्याचा आयोजन करण्यात आल्याचा आरोप तपासे यांनी केला.

महाराष्ट्रात अशा पद्धतीचे संस्कृती म्हणजे दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून दसरा मेळावा घेण्याची परंपरा, ठाकरे कुटुंबाची ,शिवसेनेची आहे. त्यात अशा पद्धतीचा नवीन वाद निर्माण करून एक वेगळ्या पद्धतीचा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न जो चालला आहे. तो राजकारणात एवढा विकोपाला जाता कामा नये ते महाराष्ट्राच्या हिताचा नाही. महाराष्ट्रासमोर अनेक अडचणी आहेत लंपीचा आजार, शेतकऱ्याचा आत्महत्या या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्र्यांनी अधिकच लक्ष घालावं एवढीच अपेक्षा असल्याचे तपासे यांनी सांगितले.

Web Title: Dussehra gathering is the culture of Shiv Sena; NCP Spokesperson Mahesh Tapase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.