आपल्या उल्हास, काळू नदी प्रदूषित होऊ नयेत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत- रुपाली शाईवाले

By अनिकेत घमंडी | Published: October 2, 2023 01:55 PM2023-10-02T13:55:43+5:302023-10-02T13:55:58+5:30

घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकल्या पाहीजेत. वस्तूंचा जास्त संग्रह करू नये असे आवाहन केले.

Efforts should be made to prevent our Ulhas, Kalu river from getting polluted - Rupali Shaiwale | आपल्या उल्हास, काळू नदी प्रदूषित होऊ नयेत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत- रुपाली शाईवाले

आपल्या उल्हास, काळू नदी प्रदूषित होऊ नयेत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत- रुपाली शाईवाले

googlenewsNext

डोंबिवली: आपण जे पाणी पितो त्या उल्हास व काळू नद्या प्रदुषीत झाल्या आहेत. त्यावर आपण प्रयत्न पूर्वक तेथे आधिक प्रदुषण होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्लास्टिकचा वापर आपण पूर्णपणे थांबविला पाहिजे, असे परखड मत पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रभात शाखा कल्याण आयोजित पर्यावरण संवर्धन घरगुती गणेशोत्सव स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी नमस्कार मंडळ कल्याण येथे झाला. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित।होत्या, पुढे त्या म्हणाल्या की, आपल्या पुढील पिढीची चिंता केली पाहिजे.

घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकल्या पाहीजेत. वस्तूंचा जास्त संग्रह करू नये असे आवाहन केले. स्पर्धेत एकूण एकूणचाळीस स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेतील सर्वच सजावटी उत्तम होत्या. त्यामुळे निकाल लावतांना परिक्षकांचीच कसोटी लागली. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व कापडाची पिशवी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण देशपांडे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रवीण देशमुख होते. शाम चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप कुलकर्णी, रविंद्र केळकर,सुभाष रायचुरा व राजेंद्र साठे आदींनी योगदान दिले. प्रथम क्रमांक सायली जयंत लेले, द्वितीय क्रमांक वैभव रिसबुड, तृतीय क्रमांक मधुरा शशांक कुलकर्णी यांना मिळाला. पहिल्या तीन क्रमांकांना प्रत्येकी रोख रू. एक हजार, प्रमाणपत्र, तुळशीचे रोप व कापडाची पिशवी देण्यात आली. 

Web Title: Efforts should be made to prevent our Ulhas, Kalu river from getting polluted - Rupali Shaiwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी