..तो  शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न; पण... ताकद दिल्यामुळेच एकनाथ शिंदेंचे धाडस - एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 11:43 AM2022-06-27T11:43:27+5:302022-06-27T11:44:10+5:30

कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार करण्यात आला.

Eknath Shinde will not be so bold without someone giving him strength says Eknath shinde | ..तो  शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न; पण... ताकद दिल्यामुळेच एकनाथ शिंदेंचे धाडस - एकनाथ खडसे

..तो  शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न; पण... ताकद दिल्यामुळेच एकनाथ शिंदेंचे धाडस - एकनाथ खडसे

Next

कल्याण : सध्या जे राजकारण चालले आहे, तो  शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. हे सगळे घडत आहे, त्यासाठी कुणी तरी ताकद दिल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाहीत. कोण त्यांच्या पाठीमागे आहे, हे भविष्यात समोर येईलच, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणमध्ये केले. 

कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत हाेते. ४० वर्षांत असे राजकारण मी अनुभवले नव्हते. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कुणाबरोबर आहे, यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केले आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल, अशी स्थिती आहे, याकडे खडसे यांनी लक्ष वेधले. या सोहळ्यास समाजबांधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘अडचणीत शरद पवारांनी दिली साथ’
प्रमाणिकपणे काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राजकारण इतक्या खालच्या स्तराला जाते हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले आहे. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होते. नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला. मागच्या आठवड्यात माझ्या बँकखाते गाेठवून खात्यात एक रुपयाही ठेवलेला नाही. त्यानंतर राहते घर १० दिवसांत रिकामे करण्याची नोटीस आली. न्यायालयातून जाऊन स्टे आणला म्हणून त्या घरात राहत आहे. माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. पण असा विचार मी करत नाही. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली. त्यांनी मदत केली नसती तर नाथाभाऊ होत्याचा  नव्हता झाला असता, असे खडसे सत्कारावेळी म्हणाले.
 

 

 

 

Web Title: Eknath Shinde will not be so bold without someone giving him strength says Eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.