'इलाका तुम्हारा, धमाका हमारा', उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार!  

By मुरलीधर भवार | Published: January 12, 2024 08:30 PM2024-01-12T20:30:01+5:302024-01-12T20:30:17+5:30

काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदानात जाहिर सभा घेतली होती.

'Elaka Tumhara, Dhamaka Hamara', Uddhav Thackeray will come to Kalyan! | 'इलाका तुम्हारा, धमाका हमारा', उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार!  

'इलाका तुम्हारा, धमाका हमारा', उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार!  

कल्याण :  १३ जानेवारी रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्याकरीता कल्याणमध्ये येणार आहे. त्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने इलाका तुम्हारा धमाका हमारा या आशयाचा बॅनर लावला आहे. त्यामुळे ठाकरे उद्या काय धमाका करणार याकडे लक्ष लागले आहे.

काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदानात जाहिर सभा घेतली होती. त्यावेळी इलाका तुम्हारा धमाका हमारा याचा उच्चार केला होता. तीच लाईन घेऊन आत्ता कल्याण शहरात बॅनर लावण्यात आला आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याण मध्ये येणार आहेत .उद्या ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. 

या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे अंबरनाथ. उल्हासनगर. कल्याण पूर्व. डोंबिवली . कल्याण ग्रामीण आणि कळवा मुंब्रा या सहा विधानसभा मतदारसंघातील शहर शाखांना भेट देत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मतदार संघाचा आढावा घेणार आहेत . उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात ठीक ठिकाणी भगवे झेंडे आणि बॅनर लावण्यात आलेत. 

कल्याण लोकसभा हा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून त्यांना आव्हान देण्यासाठी उमेदवार कोण असेल ? यावर विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. ठाकरे हे आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना करताय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 'Elaka Tumhara, Dhamaka Hamara', Uddhav Thackeray will come to Kalyan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.