ज्येष्ठ महिलांनी पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी दिले अनोखे वाण

By मुरलीधर भवार | Published: January 28, 2023 06:00 PM2023-01-28T18:00:58+5:302023-01-28T18:01:11+5:30

कल्याण - अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, महिला शाखेतर्फे वंजारी भवन कल्याण मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. ...

Elderly women gave unique varieties to preserve traditional oral literature | ज्येष्ठ महिलांनी पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी दिले अनोखे वाण

ज्येष्ठ महिलांनी पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी दिले अनोखे वाण

googlenewsNext

कल्याण - अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, महिला शाखेतर्फे वंजारी भवन कल्याण मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांनी मौखिक साहित्याचे वाण देत हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. एक वेगळेपण या कार्यक्रमातून दिसून आले.

सदर कार्यक्रमात अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या महिला शाखा अध्यक्षा लता पालवे आणि कार्याध्यक्षा वंदना सानप यांनी नष्ट होत चाललेले पारंपरिक मौखिक साहित्य जतन करण्यासाठी आगळी वेगळी संकल्पना राबवली ज्यामध्ये समाजामध्ये आजही खेड्यामध्ये लग्नाच्या वेळी प्रत्येक विधीला वेगवेगळी पारंपारिक गाणी म्हटली जातात. ही गाणी आत्ताच्या नवीन पिढीला पाठ नाहीत. तसेच माहिती देखील नाहीत. त्यामुळे हे पारंपारिक शब्दधन जुन्या पिढी सोबत नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. ते जतन व्हावे हे वाण जुन्या पिढीकडून नवीन पिढीकडे दिले जावे, म्हणून जुन्या पिढीतील महिलांचा या मौखिक पद्धतीने चालत आलेल्या पारंपरिक लग्न गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

कार्यक्रमात हौसाबाई घुगे, अनुसया आव्हाड, कलावतीबाई घुगे, बेबीताई दराडे अंजनाबाई घुगे मीराबाई घुगे, गंगुबाई घुगे, वत्सलाबाई घुगे या जुन्या पिढीच्या माहिलांनी ही पारंपरिक गीते सादर केली. या सर्व सत्तरीच्या आसपासच्या महिलाना पहिल्यांदा व्यासपीठावर बोलावून कुणीतरी त्यांनी जपलेले हे शब्दधन आत्मसात करण्याचा ,जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे याचा आनंद वाटत होता, तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. महिलांनी या गीतां सोबतच जुनी पारंपरिक मोठ मोठी उखाणी घेऊन उपस्थितांची दाद मिळवली. या आगळ्या वेगळ्या कार्यकमासाठी महिलांनी मोठया प्रमाणात गर्दी करून आनंद घेतला. हे मौखिक धन शब्दांकित करण्याची इच्छा यावेळी अनेक महिलांनी व्यक्त केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोदा आव्हाड आणि गौरी सानप यांनी केले. तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पदाधिकारी यशोदा आव्हाड, जयश्री दौंड, मनीषा घुगे, प्रेरणा काकड, सविता घुगे, अश्विनी डोमाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
 

Web Title: Elderly women gave unique varieties to preserve traditional oral literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण