Election : ... म्हणून 1 लाख 67 हजार मतदारांची नावेच यादीतून वगळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:12 PM2021-10-19T18:12:04+5:302021-10-19T18:12:30+5:30
आगामी निवडणूकीत हे मतदार मतदानाला मूकणार, 4 लाखांहून अधिक मतदारांचे यादीत फोटोच नाहीत
कल्याण-कल्याण डोंबिवली आणि ग्रामीण भागासह चार विधानसभा मतदार संघ आहेत. या चारही मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या १६ लाख ४९ हजार २७० आहे. त्यापैकी पत्तावर राहत नसलेल्या १ लाख ६७ हजार ९०९ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे हे मतदार मतदानाला मूकणार आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक कोरोनामुळे विहीत वेळत होऊ शकली नाही. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता पाहून निवडणूक जाहिर केली जाईल, असे सांगण्यात येत होते. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवली महापालिकेसह अन्य महापालिकेत बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूका घेण्याचे जाहीर केले. त्यासाठी प्रगार रचना तयार करण्याचे आदेश आयोगाने महापालिकेस दिले. प्रभाग रचनेचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले. निवडणुकीसाठी प्रगार रचना तयार होणार असल्याने निवडणूका होणार पण त्या कधी होणार याविषयी सुस्पष्टता नाही. अशा परिसरातील कल्याण डोंबिवली महापालिकेसह ग्रामीण भाग समाविष्ट असलेल्या चारही विधानसभा मतदार संघातून १ लाख ६७ हजार मतदार वगळण्याची बाब समोर आली आहे.
मतदार नाव पत्त्यावर मिळून न आल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी सांगितले. चार लाख १३ हजार ९०० मतदारांनी मतदार ओळख पत्रासाठी फोटो दिलेला नाही. फोटो न देणाऱ्या मतदारांविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बोगस मतदान टाळण्यासाठी मतदारांचा फोटो आवश्यक असतो. फोटोसह मतदार यादी अद्यावत करण्याचा कालावधी ३१ ऑक्टोबर्पयत देण्यात आला आहे. आत्तार्पयत सात हजार ७७० मतदारांची छायाचित्रे गोळा करण्यात आली आहेत.
याशिवाय २ लाख ३८ हजार २२१ मतदार हे राहत असलेल्या पत्त्यावर आाढळून अलेले नाहीत. त्यामुळे त्यांची शोध मोहिम बीएलओ कडून सुरु आहे. हे मतदार राहत असलेल्या पत्त्यावर आढळून आले नाहीत. तर त्यांचाही पत्ता मतदार यादीतून कट होण्याची शक्यता आहे. मतदारांची छायाचित्रे गोळा होणो आणि त्यांचा पत्त्याचा शोध अवघ्या १२ दिवसात निवडणूक मतदार यादीचे काम करणा:या कर्मचारी वर्गास घ्यायचा आहे. हे काम कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी एक प्रकारचे आव्हान आहे.
मतदारांची यादी नोंदणी अधिकाकारी कार्यालयात लावली आहे. ज्या मतदारांचा फोटो नसेल त्यांनी फोटा रहिवास पुराव्यासह द्यावा. त्याचबरोबर ज्यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांनी देखील त्याच्या रहिवास पुराव्यासह विहीत नमुन्यातील अर्ज नोंदणी कार्यालयात करावा. तर त्यांच्या मतदानाचा हक्क अबाधित राहू शकतो अन्यथा लोकशाहीच्या हक्क बजावण्यापासून ते वंचित राहू शकतात याकडे उपविभागीय अधिकारी भांडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या
कल्याण पश्चिम-४ लाख ७८ हजार
कल्याण पूर्व-३ लाख ५७ हजार
कल्याण ग्रामीण -४ लाख ४० हजार
डोंबिवली-३ लाख ७२ हजार