सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन

By अनिकेत घमंडी | Published: August 31, 2023 03:58 PM2023-08-31T15:58:41+5:302023-08-31T15:58:59+5:30

डोंबिवली: सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात ...

Electricity supply to public Ganesh Mandals at domestic rates; Mahavitran appeals to Ganesh Mandals to get official electricity connection | सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन

googlenewsNext

डोंबिवली: सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेत अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे जाहीर आवाहन महावितरणने गुरुवारी केले.

गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत आदी कागदपत्र आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. 

गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचे वीज अपघात होऊ नये, यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत कंत्राटदारांकडून करून घ्यावी. गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२, १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक ग्राहकांच्या सेवेत २४ तास उपलब्ध असून त्यावर संपर्क करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Electricity supply to public Ganesh Mandals at domestic rates; Mahavitran appeals to Ganesh Mandals to get official electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.