मालकांनी साेडून दिलेल्या इमूला पाॅजने केले फ्रीडम फार्ममध्ये जमा
By मुरलीधर भवार | Published: February 8, 2023 04:01 PM2023-02-08T16:01:10+5:302023-02-08T16:01:19+5:30
इमू पक्षी पालनाचा व्यवसाय धाेक्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी पाळलेले इमू माेकाट साेडून दिले.
कल्याण-इमू पक्षी पालनाचा व्यवसाय धाेक्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी पाळलेले इमू माेकाट साेडून दिले. त्यापैकी एका इमूला मुरबाडच्या म्हसा येथील जंगलात पकडून त्याला फ्रीडम फार्ममध्ये जमा केले असल्याची माहिती पाॅजचे प्रमुख निलेश भणगे यांनी दिली आहे.
१५ वर्षापूर्वी राज्य सरकारने व्यावसायिक शेती अंतर्गत पक्षी प्रजनन कार्यक्रमास मान्यता दिली. ज्याचे नाव इमू फार्मिंग हाेते.
२०६ साली तामिळनाडूच्या इराेड जिल्ह्यात इमूचा पहिला कळप आला. इमू हा मूळचा आॅस्ट्रेलियाचा फ्लाइटलेस पक्षी आहे. या पक्षाची अंडी जास्त किंमतीला विकली जात असल्याने अनेकांनी या इमू पालनाकडे वळले. मात्र इमू पालन उद्याेग हा भारतात काेलमडला आहे. बिझनेस वीकने दिलेल्या अहवालानुसार २०२१ साली भारतात इमूची संख्या २ दक्ष लक्ष हाेती. आजमितीस आठ लाख इतकी आहे. १२ लाखाने संख्या घटली आहे.
इमू पालन शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातून फायदा हाेत नाही. त्यांच्या आहाराचे आेझे नकाेसे झालेल्या शेतकऱ्यांनी इमू पक्षी माेकाट साेडून दिले आहेत. असाच एक इमू पक्षी मुरबाड येथील म्हसा परिसरात माेकाट फिरत असल्याचा काॅल पाॅल संस्थेला आला. ताे त्यांनी तात्काळ घेतला. एका इमू पक्षाला देवेंद्र निलाखे आणि आेंकार साळूंखे यांनी ताब्यात घेतले. त्याला फ्रिडम फार्ममध्ये ठेवले आहे.