लॉकडाऊन काळात उद्योजकांचा मदतीचा हात, गारपीटग्रस्त गावांना मदत तर वंचित घटकांसाठी अन्नदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:37 PM2021-05-17T16:37:48+5:302021-05-17T16:38:48+5:30

कामा संघटना गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण ग्रामीण परीसरातील गरजूंना जेवण पुरवत आहे. विशेष म्हणजे हा सर्व  स्वयंपाक महिला बचत गटातील महिला बनवत असल्याने त्यांनासुद्धा रोजगार मिळाला आहे. 

Entrepreneurs lend a hand during lockdown, help hail-hit villages and donate food to disadvantaged groups | लॉकडाऊन काळात उद्योजकांचा मदतीचा हात, गारपीटग्रस्त गावांना मदत तर वंचित घटकांसाठी अन्नदान

लॉकडाऊन काळात उद्योजकांचा मदतीचा हात, गारपीटग्रस्त गावांना मदत तर वंचित घटकांसाठी अन्नदान

googlenewsNext

कल्यान/डोम्बिवली - कोरोना संकटामुळे आर्थिक घडी कोलमडली असून अनेकांच्या हाताला काम नसल्यानं दोन वेळच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर कामा संघटना गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण ग्रामीण परीसरातील गरजूंना जेवण पुरवत आहे. विशेष म्हणजे हा सर्व  स्वयंपाक महिला बचत गटातील महिला बनवत असल्याने त्यांनासुद्धा रोजगार मिळाला आहे. 

याच बरोबर मुरबाड परिसरातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये गारपीट झाल्याने येथील गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काहींचे  घराचे पत्र उडून गेले व घरातील वस्तूंचेही नुकसान झाले. याची दखल घेत कामा संघटनेने या सर्व गावांमध्ये जाऊन धान्य वाटप केले. नाका कामगार असो वा इतर हातावर  पोट असणार कष्टकरी असो, संघटनेच्या अन्नदानामुळे, अशा सर्व लोकांना काहीसा दिलासा मिळालाय. कठीण काळात उद्योजकानी मदतीचा हात पुढे केल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

Web Title: Entrepreneurs lend a hand during lockdown, help hail-hit villages and donate food to disadvantaged groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.