काही लोक देव पाण्यात बूडवून बसले असले तरी आमचे निलंबन होणार नाही - विश्वनाथ भोईर

By मुरलीधर भवार | Published: July 15, 2023 03:41 PM2023-07-15T15:41:19+5:302023-07-15T15:52:10+5:30

सध्या राज्याच्या राजकारणात दररोज नव नव्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.

Even if some people drown God in water, we will not be suspended says vishvnath bhoir | काही लोक देव पाण्यात बूडवून बसले असले तरी आमचे निलंबन होणार नाही - विश्वनाथ भोईर

काही लोक देव पाण्यात बूडवून बसले असले तरी आमचे निलंबन होणार नाही - विश्वनाथ भोईर

googlenewsNext

कल्याण - काही लाेक देव पाण्यातू बुडवून बसले आहेत. निर्णय वेगाने घ्या की हळूहळू घ्या. आमचे निलंबन होणार नाही. आम्ही सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत राहून केल्या आहे. सर्वोच्च न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कसलीही भीती नाही असे प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दीिली आहे. ठाकरे गटाचे सूनिल प्रभू सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणीसाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर आमदार भोईर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात दररोज नव नव्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. हे सर्व सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार सूनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १६ आमदारांच्या आपत्रेते संदर्भात निर्णयासा्ठी विलंब केला जात आहे. त्यासाठी न्यायालायने दखल घ्यावी. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना नोटिस बजावली आहे. त्यांनी या प्रकरणी १४ दिवसात उत्तर द्यायचे आहे.

१६ आमदारांचे काय होणार ही चर्चा राजकारणात सूरु झाली आहे. या बाबत आमदार भोईर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे गटाचे सूनिल प्रभू यांनी जी याचिका दाखल केली आहे. आमदारांच्या निलंबनाबाबत त्या प्रक्रियेला वेग येणार अशा बातम्या प्रसार माध्यमावर सुुरु आहेत खरं तर हे बऱ्याच दिवसापासून सुुरु आहे. त्याला आमदार भाेईर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

Web Title: Even if some people drown God in water, we will not be suspended says vishvnath bhoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.