श्रध्दास्थानेही सुरक्षित नाहीत, गावदेवी मंदिर चोरट्याकडून लक्ष

By प्रशांत माने | Published: February 9, 2023 07:44 PM2023-02-09T19:44:17+5:302023-02-09T19:45:02+5:30

ठाकुर्लीतील कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रोडलगतच कचोरे गावचे गावदेवी मंदिर आहे.

even shrines are not safe gavdevi temple is a target of thieves | श्रध्दास्थानेही सुरक्षित नाहीत, गावदेवी मंदिर चोरट्याकडून लक्ष

श्रध्दास्थानेही सुरक्षित नाहीत, गावदेवी मंदिर चोरट्याकडून लक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: शहरात सातत्याने घडणा-या चोरी, घरफोडीच्या घटना नवीन नाहीत. श्रध्दास्थाने ही सुरक्षित नसल्याचे ठाकुर्ली कचोरेतील गावदेवी मंदिरात बुधवारी दिवसाढवळया झालेल्या चोरीच्या घटनेतून समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिरात गेल्या काही वर्षातील चोरीची ही तिसरी घटना आहे. एकिकडे बंद घरे सुरक्षित राहिली नसताना चोरटयांची वक्रदृष्टी पाहता मंदिरे सुरक्षित नाहीत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ठाकुर्लीतील कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रोडलगतच कचोरे गावचे गावदेवी मंदिर आहे. बुधवारी दुपारी २.५० च्या सुमारास चोरटयाने मंदिरात प्रवेश केला. तेथील मोठी समई चोरण्याचा प्रयत्न केला. परंतू ती नटबोल्टने जमिनीपासून फिट असल्याने ती त्याला चोरता आली नाही. 

अखेर त्याने देवीच्या समोरील छोटे दिवे आणि त्रिशुल चोरून तेथून पोबारा केला. गतवर्षीही या मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता. तर डिसेंबर २०१७ मध्ये याच मंदिराचे ग्रीलचे कुलूप तोडून अर्धा किलोचा पंचधातूचा मुखवटा चोरला होता. आता पुन्हा बुधवारी चोरीचा प्रकार घडल्याने मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या चोरीप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान संबंधित भूरटया चोराला पकडण्यात आले असून त्याच्याकडून चोरीचा माल देखील हस्तगत करण्यात आल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे यांनी दिली. या परिसरात सोनसाखळी, वाहनचोरी आणि घर, मंदिर लुटण्याच्या घडणा-या घटना पाहता पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी कचोरेतील ग्रामस्थ तथा केडीएमटीचे माजी सभापती मनोज चौधरी यांनी केली आहे.

देवीला नमस्कार केला आणि केली चोरी

हा प्रकार मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तो मंदिरात आला त्याने प्रथम दोन्ही हातांनी देवीला नमस्कार केला. त्यानंतर त्याने देवीच्या डाव्या बाजुकडील एका कोप-यात असलेल्या मोठया समईकडे मोर्चा वळविला. पण ती त्याला चोरता आली नाही. तो पुन्हा देवीच्या समोर आला आणि हात जोडले. काही मिनिटांतच तिथला त्रिशुळ आणि अन्य वस्तू चोरून पिशवीत घातल्या आणि तेथून पोबारा केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: even shrines are not safe gavdevi temple is a target of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.