समाजातील प्रत्येक महिला ही अलौकिकाच - डॉ. विजय सुर्यवंशी

By मुरलीधर भवार | Published: March 13, 2023 03:58 PM2023-03-13T15:58:55+5:302023-03-13T15:59:38+5:30

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात कार्यक्रमामाचे आयोजन काल करण्यात आले होते.

Every woman in the society is extraordinary - Dr. Vijay Suryavanshi | समाजातील प्रत्येक महिला ही अलौकिकाच - डॉ. विजय सुर्यवंशी

समाजातील प्रत्येक महिला ही अलौकिकाच - डॉ. विजय सुर्यवंशी

googlenewsNext

कल्याण - स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पूर्वीच्या काळापासून स्त्रियांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक स्त्री ही अलौकीकाच असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी येथे व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात कार्यक्रमामाचे आयोजन काल करण्यात आले होते.आयुक्त सुर्यवंशी आणि डॉ. आरती सुर्यवंशी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आयुक्त सुर्यवंशी यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.

कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या वैशाली जोशी, जयश्री भावे, वर्षा म्हेतर, सोनाली पांचाळ, डॉ. सोनाली पितळे- सिंग या कर्तुत्ववान महिलांसह जान्हवी जाधव या तरुणीचा आयुक्त सुर्यवंशी आणि डॉ. आरती सुर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. आरती सुर्यवंशी यांनी महिलांच्या आयुष्यावर आधारित सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

या कार्यक्रमास कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, केडीएमसी सचिव संजय जाधव, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अशोक प्रधान , के.सी.गांधी शाळेचे विश्वस्त मनोहर पालन, रोटरी क्लबचे मदन शंकलेशा आदी मान्यवर उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, उपाध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, सचिव डॉ. सुरेखा ईटकर, खजिनदार डॉ. हिमांशु ठक्कर यांच्यासह डॉ. प्रदीप सांगळे, डॉ. आश्विन कक्कर, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. स्वाती शेलार, डॉ. सोनाली पाटील, डॉ. सोनाली पितळे सिंग यांनीविशेष मेहनत घेतली.

समाजातील प्रत्येक महिला ही अलौकिकाच - डॉ. विजय सुर्यवंशी

कल्याण - स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पूर्वीच्या काळापासून स्त्रियांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक स्त्री ही अलौकीकाच असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी येथे व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात कार्यक्रमामाचे आयोजन काल करण्यात आले हेते. आयुक्त सुर्यवंशी आणि डॉ. आरती सुर्यवंशी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आयुक्त सुर्यवंशी यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.

कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या वैशाली जोशी, जयश्री भावे, वर्षा म्हेतर, सोनाली पांचाळ, डॉ. सोनाली पितळे- सिंग या कर्तुत्ववान महिलांसह जान्हवी जाधव या तरुणीचा आयुक्त सुर्यवंशी आणि डॉ. आरती सुर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. आरती सुर्यवंशी यांनी महिलांच्या आयुष्यावर आधारित सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

या कार्यक्रमास कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, केडीएमसी सचिव संजय जाधव, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अशोक प्रधान , के.सी.गांधी शाळेचे विश्वस्त मनोहर पालन, रोटरी क्लबचे मदन शंकलेशा आदी मान्यवर उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, उपाध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, सचिव डॉ. सुरेखा ईटकर, खजिनदार डॉ. हिमांशु ठक्कर यांच्यासह डॉ. प्रदीप सांगळे, डॉ. आश्विन कक्कर, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. स्वाती शेलार, डॉ. सोनाली पाटील, डॉ. सोनाली पितळे सिंग यांनीविशेष मेहनत घेतली.

प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले
महाभारत काळातील संमोहित राधाचे भक्तीप्रेम, रामायणातील कैकयीची फार कमी लोकांना माहीत असणारी दुसरी बाजू आणि भगवान गौतम बुद्ध काळातील महाप्रजापती गौतमी यांचा भारतीय महिलांना बौद्ध धर्मात प्रवेश मिळवून देण्याचा लढा मीना सोनवणे यांनी आपल्या अप्रतिम अभिनयातून सादर करत या तिन्ही स्त्रियांचे फारसे कोणाला माहीत नसणारे अंतरंग उलगडून दाखवले. ज्यावर उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले.

Web Title: Every woman in the society is extraordinary - Dr. Vijay Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण