Kalyan: कल्याण स्टेशन पारिसरात सगळ्य़ांना मुभा आम्हाला मात्र बंदी, टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ
By मुरलीधर भवार | Published: December 9, 2022 04:29 PM2022-12-09T16:29:45+5:302022-12-09T16:30:09+5:30
Kalyan: कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास काम सुरु आहे. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. रिक्षा, बस, टेम्पो यांना स्टेशन परिसरात वाहतूकीसाठी कुठलीही बंदी नाही. मात्र सहा आसनी रिक्षा चालकांना बंदी करण्यात आली आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास काम सुरु आहे. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. रिक्षा, बस, टेम्पो यांना स्टेशन परिसरात वाहतूकीसाठी कुठलीही बंदी नाही. मात्र सहा आसनी रिक्षा चालकांना बंदी करण्यात आली आहे. या बंदीमुळे सहा आसनी रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना प्रशासन दाद देत नसल्याचे टॅक्सी चालकांनी सांगितले.
टॅक्सी चालक मालक संघटना कृती समितीचे पदाधिकारी आणि टॅक्सी चालक उमाकांत भालेराव, गजानन गावडे, रुपेश जाधव, संदीप मुकादम, प्रमोद पाटील, माधव लांबे, अनिल तिवारी यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेऊन महापालिकाआयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
पदाधिकारी भालेराव यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या कामाला आमचा विरोध नाही. मात्र वाहतूक नियोजन करताना आमच्या त्यात कुठेही सहभाग घेण्यात आलेला नाही. महालक्ष्मी हॉटेलसमोर आमचा टॅक्सीचा स्टॅण्ड आहे. त्याठिकाणी ५० टॅक्सी चालक व्यवसाय करतात. कल्याण पडघा मार्गावर आमच्या टॅक्सी चालतात. आमच्या टॅक्सी चालकांना दुर्गाडी येथे स्टॅण्ड दिला आहे. केडीएमटीकडून स्टेशन ते दुर्गाडीकडे जाण्यासाठी मिनी बसची व्यवस्था केली जाणार होती. ही व्यवस्था काही केलेली नाही. प्रवासी मिनी बसने प्रवास करुन दुर्गाडी येथे येणार नाही. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा सगळ्य़ात जास्त फटका आम्हाल बसला असल्याचे टॅक्सी चालकांनी सांगितले.
स्टेशन परिसरात एसटी बस, केडीएमटी, एनएमएमटी, टेम्पो यांना प्रवेश देण्यावर कुठलेही बंधन लादण्यात आलेले नाही. स्टेशन परसरातून २० हजार पेक्षा रिक्षा धावत आहेत. या सगळ्य़ामुळे कुठही वाहतूक कोंडी होत नाही. मग बंदी केवळ टॅक्सी चालकांनाच का असा संतप्त सवाल टॅक्सी चालकांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आले. आमला स्टेशन परिसरात व्यवसाय करु दिला जात नाही. काही विशिष्ट रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनावर पोलिस कारवाई करीत नाहीत. केवळ काळ्य़ा पिवळया टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते. पोलिसांच्या कारवाईत दुजाभाव दिसून येतो. आम्हालाही व्यवसाय करण्याची मुभा द्यावी अशी मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.