वरिष्ठांचा जाच; सहायक लोको पायलटने संपवलं जीवन, कल्याणमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 06:31 AM2023-08-21T06:31:24+5:302023-08-21T06:31:36+5:30

तणावात टोकाचे पाऊल उचलल्याचा सहकाऱ्यांचा आरोप

Examination of superiors; Assistant loco pilot ends life, incident in Kalyan | वरिष्ठांचा जाच; सहायक लोको पायलटने संपवलं जीवन, कल्याणमधील घटना

वरिष्ठांचा जाच; सहायक लोको पायलटने संपवलं जीवन, कल्याणमधील घटना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : सहायक लोको पायलट सुजित कुमार जयंत (वय ३३) यांनी कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी येथील घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी सुजित कुमार आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी, कामावर रुजू करून घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, वरिष्ठांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने या तणावात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

मुंबईत लोको पायलट असलेले सुजित यांच्या तीन महिन्यांपासून गैरहजेरी लावत सप्टेंबरपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची छळवणूक सुरू होती, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

सुजित कुमार कल्याणमध्ये एकटेच राहायचे. सुजित कोळसेवाडी येथे एकटेच राहत होते. त्यांचा मोठा भाऊ आणि आई दोघेही त्यांच्या उत्तर प्रदेशातील मूळगावी राहतात. सुजित यांच्या आत्महत्येची माहिती कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कर्मचारी आक्रमक

  • घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर तसेच रेल्वे मोटरमन कार्यालयाबाहेर अनेक रेल्वे कर्मचारी जमा झाले. या वेळी, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. 
  • सुजित यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. त्यांची चौकशी करावी. त्याचबरोबर कामगारांचे कामाचे तास कमी करावेत, अशी मागणी केल्याचे रनिंग ब्रांच अति. सचिव एससी. एसटी. असोसिएशनचे राहुल गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Examination of superiors; Assistant loco pilot ends life, incident in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण