"नेतृत्व कसे गुलामगिरी करायला लावते, याचे उदाहरण", नाना पटोलेंचा भाजपकडून निषेध
By अनिकेत घमंडी | Published: June 19, 2024 12:07 PM2024-06-19T12:07:06+5:302024-06-19T12:07:30+5:30
इंदिरा गांधी चौकात निषेध व्यक्त करून काँग्रेस हाय हाय, नाना पटोले मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
डोंबिवली: काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शेगाव येथे त्यांचे समर्थक पदाधिकाऱ्यांना पाय धुवायला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी डोंबिवलीमध्ये त्यांचा भाजप कल्याण जिल्ह्याच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पूर्व मंडळाने निषेध केला. येथील इंदिरा गांधी चौकात निषेध व्यक्त करून काँग्रेस हाय हाय, नाना पटोले मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपचे ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी पटोले यांचे नेतृत्व कसे गुलामगिरी करायला लावते. याचे उदाहरण असून त्या व्हायरल व्हिडीओने ही गोष्ट समाजासमोर आली आणि तरीही पटोले स्वतः असे काही झालेच नाही, असे म्हणत आहेत, हे योग्य नाही, असे शशिकांत कांबळे म्हणाले.
समजा चूक झाली तर झाली, ती मान्य करायला काय हरकत आहे, परंतु तरीही ते मान्य होत न करणे या प्रवृत्तीचा निषेध आहे. काँग्रेस हे कार्यकर्त्यांना गुलाम समजतात हे यावरून स्पष्ट झाले. सातत्याने हे दिसत आहे. त्याउलट भाजप पक्षात मात्र कार्यकर्त्यांना महत्व देऊन पक्ष बांधणी केली जाते हे महत्त्वाचे आहे. पक्षाची संस्कृती, संस्कार यावरून दिसून येतात. त्यामुळे निदान आता तरी समाजासमोर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे, असे पूर्व मंडळ अध्यक्ष विषु पेडणेकर म्हणाले. यावेळी महिला मोर्चाच्या पूनम पाटील, जिल्हा सरचिटणीस राजू शेख, युवा मोर्चा चमू आदी उपस्थित होते.