आसनगाव स्थानकात एक्स्प्रेस इंजिनात बिघाड, मध्य रेल्वे सेवा विस्कळीत; शेकडो प्रवाशांची पायपीट
By अनिकेत घमंडी | Published: February 2, 2023 10:14 AM2023-02-02T10:14:08+5:302023-02-02T10:14:42+5:30
आसनगाव स्थानकात काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना सकाळी ८.१५ ते ८.४५ वाजेदरम्यान घडल्याने मध्य रेल्वे त्या मार्गावर पाऊण तास कोलमडली होती.
डोंबिवली:
आसनगाव स्थानकात काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना सकाळी ८.१५ ते ८.४५ वाजेदरम्यान घडल्याने मध्य रेल्वे त्या मार्गावर पाऊण तास कोलमडली होती. आता ती एक्सप्रेस आटगाव स्थानकात लूपमध्ये उभी करण्यात आली असून *लोकल सेवा पूर्ववत झालेली असली तरी शेकडो प्रवाशांनी रेल्वे रुळातून पायपीट करत आसनगाव स्थानक गाठले.
बुधवारी देखील मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने आसनगाव ते कसारा सव्वा तास डाऊन मार्ग ठप्प।झाला होता. गुरुवारच्या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप।झाला, अनेकांना कामावर जायला उशीर झाल्याने दिवसाचे नियोजन सपशेल कोलमडले.
सतत होणाऱ्या तांत्रिक बिघडचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असून याकडे रेल्वे प्रशासनाने गंभीर्य देऊन प्रभावी उपाययोजना करायला हवी अशी मागणी कल्याण कसारा रेल्वे पॅसें असो चे उमेश विशे यांनी केली.