दगावलेला रुग्ण जिवंत असल्याची खोटी बतावणी, माजी आमदार संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 02:24 PM2021-05-12T14:24:13+5:302021-05-12T14:25:24+5:30

भाजपाच्या माजी आमदाराने तीव्र संताप व्यक्त करत संबंधित हॉस्पीटल प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

The false pretense that the battered patient was alive, infuriated the former MLA | दगावलेला रुग्ण जिवंत असल्याची खोटी बतावणी, माजी आमदार संतापले 

दगावलेला रुग्ण जिवंत असल्याची खोटी बतावणी, माजी आमदार संतापले 

Next
ठळक मुद्देकेडीएमसीच्या आर्ट गॅलरी विरोधात कारवाई करा, भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी

कल्याण - महापालिकेच्या कल्याण आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला असतान तो जिवंत असल्याची खोटी माहिती भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना कोविड रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पवार यांनी संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात माजी आमदार पवार यांनी माहिती दिली की, त्यांच्या परिचयातील एक रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्या रुग्णाची काय स्थिती आहे याची विचारणा रुग्णालय प्रशासनाकडे करा असे सांगितले होते. त्यांच्या सांगण्यानुसार पवार यांनी माहिती विचारली असता रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. मात्र, रुग्ण जिवंत असल्याची माहिती दिली गेली होती. हीच माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना पवार यांनी दिली तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले की, आमचा रुग्ण दगावला आहे. हा प्रकार ऐकून पवार यांना धक्काच बसला. त्यावर या प्रकरणी पवार यांनी सांगितले की, माजी आमदाराला रुग्णालय प्रशासनाकडून खोटी माहिती दिली जात असेल तर सामान्य नागरीकांची काय स्थिती असेल, असा सवल उपस्थित केला. 

दरम्यान, आर्ट गॅलरी रुग्णालयाच्या विरोधात रुग्णाच्या नातेवाईकांच्या अनेक तक्रारी आहेत. काही दिवसापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रुग्णालयास भेट दिली होती. त्यावेळीही रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या विरोधातील तक्रारीचा पाढा वाचला होता. हा मुद्दाही पवार यांनी उपस्थित केला आहे. ही गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी संबंधित रुग्णालय चालकाच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Web Title: The false pretense that the battered patient was alive, infuriated the former MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.