मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध; पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु

By मुरलीधर भवार | Published: June 28, 2024 05:22 PM2024-06-28T17:22:09+5:302024-06-28T17:22:35+5:30

शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला विरोध केला असला तरी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु ठेवले आहे.

Farmer opposition to Metro Rail's land survey; Survey started in police facilities | मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध; पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु

मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध; पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु

कल्याण - तळोजा या मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा ही मेट्रो रेल्वेच्या कामाकरीता राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली आहे. त्याठिकाणी जागा सर्वेक्षणाकरीता एमएमआरडीएचे सर्व्हेअर गेले असता शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला. पण सर्वेक्षण करणाऱ््या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त सर्वेक्षण सुरु ठेवले आहे. यावेशी संतप्त शेतकऱ्यानी तहसीलदारांना एक निवेदन दिले आहे. 

माणगाव, उंबार्ली, माणगाव परिसरात जागा राज्य सरकारने महसूल खात्यामार्फत कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या प्रकल्पाकरीता वर्ग केली आहे. प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आलेली जागा ही गायरान आहे. या गायरान जागेवर अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे आहे. ही बांधकामे हटविण्याची नोटिस या पूर्वीच तहसील कार्यालकाडून देण्यात आली आहे. गायरान जमीनीवरील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे नियमित करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने २०२२ साली दिले आहे.

या ठिकाणी शेतकरी दशरथ म्हात्रे यांनी सांगितले की, आमची शेतजमीन वडिलोपार्जित आहे. ही जागा प्रकल्पाच्या बाधित गायरान जमीनीच्या मध्ये आहे. त्याठिकाणी एमएमारडीएकडून जबरदस्तीने सर्वेक्षण केले जात आहे. आमच्या शेतजागेचा मोबदला आम्हाला द्यावा. मगच सर्वेक्षणाचे काम करावे. या बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील यांनी देखील या सर्वेक्षणास विरोध केला आहे. या ठिकाणी असलेल्या पाच बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सह्याचे एक निवेदन यावेळी तहसीलदारांना दिले. शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला विरोध केला असला तरी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु ठेवले आहे.

Web Title: Farmer opposition to Metro Rail's land survey; Survey started in police facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो