रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा; युवासेनेची मागणी
By मुरलीधर भवार | Published: December 6, 2023 05:41 PM2023-12-06T17:41:13+5:302023-12-06T17:42:49+5:30
शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
मुरलीधर भवार,कल्याण: रिंग रूट प्रकल्पात भूमीपुत्रांच्या जमिनी बाधित होत आहेत. त्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला देण्यात यावा अशी मागणी शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डा’. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे . ज्यांच्या या प्रकल्पासाठी जमिनी या आधी हस्तांतरित केल्या आल्यात त्यांना देखील या मोबदल्याचा लाभ देण्या यावा. रिंग रोडच्या दुर्गाडी ते मोठा गाव या टप्पा पूर्णत्वास आल्यास डोंबिवली शहराचा कायापालट होणार आहे.या रस्त्यात अतिक्रमणे नसल्याने या टप्प्याचे काम लवकर पूर्ण होऊ शकते असे म्हात्रे यांनी सांगितले.
रिंग रोड हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोडी सुटणार आहे. या प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा टप्पा ३ हजा दुर्गाडी ते मोठा गाव हा आहे. त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या तिसऱ््या टप्प्याच्या कामाकरीता ७० टक्के जमीन संपादीत झालेली आहे. उर्वरीत ३० टक्के जमीनीचे संपादन सुरु आहे. मात्र बाधितांना वाढीव मोदला दिला जावा. प्रकल्पाची जागा संपादित करताना दोन पट टीडीआर ऐवजी चार पट टीडीआर दिला जावा. एमएमआरडीएच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भूसंपादन करण्यावर चर्चा
झाली होती. प्रचलित नियमानुसार दिले जाणारा दोन पट टीडीआर हा तूटपूंजा आहे. काहीच्या जमीनी या आधीच संपादीत करण्यात आलेल्या आहे. तर काहींच्या जमीनींचे संपादन बाकी आहे. मात्र ज्यांच्या जमिनी आधी संपादीत केलेल्या आहे. त्यांना देखील चार पट टीडीआर स्वरुपाती मोदल्याचा लाभ दिला जावा. त्यामुळे जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक सुकर होईल. म्हात्रे यांच्या मागणीस खासदार शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन हा विषय मार्गी लावला जाईल असे म्हात्रे यांना खासदार शिंदे यांनी कळविले आहे.