ठाणे-पालघरमधील शेतकऱ्यांनी भरली पावणेदोन कोटी रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:29 AM2021-02-12T01:29:07+5:302021-02-12T01:29:20+5:30

अभियानाच्या पहिल्या १५ दिवसांतच कृषिपंप ग्राहकांनी एक कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी भरून तितक्याच रकमेची सवलत मिळवल्याची माहिती गुरुवारी दिली.

Farmers in Thane-Palghar pay arrears of Rs | ठाणे-पालघरमधील शेतकऱ्यांनी भरली पावणेदोन कोटी रुपयांची थकबाकी

ठाणे-पालघरमधील शेतकऱ्यांनी भरली पावणेदोन कोटी रुपयांची थकबाकी

Next

डोंबिवली : कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी महावितरणने प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या महाऊर्जा अभियानाला कल्याण परिमंडळात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पहिल्या १५ दिवसांतच कृषिपंप ग्राहकांनी एक कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी भरून तितक्याच रकमेची सवलत मिळवल्याची माहिती गुरुवारी दिली.

या परिमंडळात एकूण २३ हजार ४८८ कृषिपंप ग्राहक असून त्यांच्याकडे २८ कोटींचे वीजबिल थकीत आहे. त्यांतील साडेसहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद असून त्यांच्याकडे आठ कोटी ७८ लाख, तर वीजपुरवठा सुरू असणाऱ्या उर्वरित ग्राहकांकडे १९ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ, त्यानंतरच्या थकबाकीवर विलंब आकार माफ व प्रचलित दरानुसार आकारलेला व्याजदर या अभियानातील तरतुदींमुळे एकूण थकबाकीच्या रकमेतून दोन कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडलातील शेतकऱ्यांनी २५ कोटी ७५ लाख रुपयांच्या एकूण थकबाकीपैकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८७ लाख रुपये चालू वीज बिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. 

Web Title: Farmers in Thane-Palghar pay arrears of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज