भय इथले संपत नाही; कल्याण पुर्वेतील कचोरे टेकडीवर राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 02:12 PM2021-06-14T14:12:54+5:302021-06-14T14:13:07+5:30
संरक्षक जाळीची मागणी करूनही प्रशासनांच दुर्लक्ष, लोकप्रतिनिधीचा आरोप
केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एनडीआरएफच्या टिमसोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती व नेतीवली क कचोरे टेकडीची पाहणी केली. पाहणी झाली मात्र आता पुढे काय? असा सवाल निर्माण झाला आहे. कारण कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीवर आजही नागरिक भीतीच्या छायेखाली रहात आहे. या परिसरात एका ठिकाणी दगड पडू नये म्हणून संरक्षक जाळीसाठी पोल उभे करण्यात आलेय. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाळी दिसून येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून संरक्षक जाळी बसवण्याबाबत आम्ही पाठपुरावा करतोय पण याकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी केला आहे.
डोंगराच्या अगदी तोंडाशी काही घर आहेत. अनेकदा लहान मोठे दगड या ठिकाणी पडतात. मात्र जीव मुठीत घेऊन आम्ही रहातो अस येथील नागरिक सांगतात.अनेकदा या ठिकाणी दुर्घटना देखील घडल्यात. आम्हाला फक्त सुरक्षा पाहिजे असं येथील नागरिक सांगतात. मात्र घराच्या तोंडाशी असलेला हा उंच डोंगर पाहून तुमच्या मनात सुद्धा धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
मागच्या वर्षी या घरावर दरड कोसळून संपूर्ण घराचा चक्काचूर झाला होता.अतिवृष्टी झाली तर पुन्हा या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत आम्ही संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना विचारल असता त्यांनी सांगितलं की नुकताच एनडीआरएफच्या टीम सोबत केडीएमसी आयुक्तांनी या टेकडीची पाहणी केलीय. येथील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली असून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्यात.
अतिवृष्टीच्या काळात केडीएमसीनं या लोकांची पर्यायी व्यवस्था केलीये मात्र लोक येथून हालायला मागत नाही, अस त्यांनी सांगितलं. तसेच या ठिकणी उपाय योजना करण्याबाबत विचार सुरू असल्याच अभियंता सुभाष पाटील यांनी सांगितलं. आता प्रशासन , कचोरे येथील रहिवासी आणि स्थानिक प्रतिनिधी यांनी एकत्र येत यावर योग्य तो तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.