सरकारी स्पर्धांमध्ये फी वाढीचा खेळाडूंना फटका, स्पर्धेत प्रवेश न घेण्याचा अनेक शाळांचा निर्णय

By मुरलीधर भवार | Published: October 14, 2022 02:54 PM2022-10-14T14:54:26+5:302022-10-14T14:54:56+5:30

मुरलीधर भवार- कल्याण कल्याण -कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा आयोजन करण्यात येते. परंतु त्याआधी जिल्हा क्रीडा अधिकारी ...

Fee hike in government competitions hits players many schools decide not to enter the competition | सरकारी स्पर्धांमध्ये फी वाढीचा खेळाडूंना फटका, स्पर्धेत प्रवेश न घेण्याचा अनेक शाळांचा निर्णय

सरकारी स्पर्धांमध्ये फी वाढीचा खेळाडूंना फटका, स्पर्धेत प्रवेश न घेण्याचा अनेक शाळांचा निर्णय

Next

मुरलीधर भवार-कल्याण

कल्याण-कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा आयोजन करण्यात येते. परंतु त्याआधी जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांच्याकडे महानगर परिसरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय या खेळाडूंची वार्षिक फी भरावी लागते. ती आजपर्यंत कमी होती परंतु यावर्षी दुप्पट करण्यात आल्यामुळे शाळा मुख्याध्यापक, प्राचार्य आणि क्रीडा शिक्षक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. फक्त ठाणे विभागात फी वाढवली असल्यामुळे शिक्षकांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे. विद्यार्थ्यांना ,पालकांना, शाळा यांना फी चा नाहक भुर्दंड भरावा लागत आहे. या वाढलेल्या फीजमुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज खेळाडू स्पर्धेपासून वंचित राहणार आहेत.

कोरोना महामारी नंतर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू फी कमी आहे किंवा माफ केली जात असताना ठाणे विभागात विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंची फी वाढवून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे.त्यामुळे गरीब व होतकरू खेळाडूंनी शालेय स्पर्धांमध्ये भाग घेऊ नये, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे धोरण दिसत आहे.

वाढलेल्या फीजमुळे अनेक शाळांनी स्पर्धेमध्ये प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे शाळेतील खेळाडूंचे खूप मोठे नुकसान होणार आहे. या वाढलेल्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील क्रीडा शिक्षक एकत्र आले असून त्यांनी मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांनाही मेल केले आहेत. तसेच कल्याण तालुका शारीरिक शिक्षण मंडळातर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले आहे

वाढलेल्या फीस मुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंचे खूप मोठे नुकसान होणार असून या वाटलेल्या फिस मुळे अनेक शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार नाहीत. त्यामुळे खेळाडू स्पर्धेच्या बाहेर जाणार आहेत. क्रीडा क्षेत्राचे खूप मोठे नुकसान होणार आहे.
लक्ष्मण इंगळे
अध्यक्ष, कल्याण तालुका शारीरिक क्रीडा संघटना                                    

मुंबई विभागामध्ये फक्त ठाणे जिल्ह्याची फीस वाढवण्यात आली असून ठाणे जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष फिस वाढ झालेली नव्हती आणि शासनाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये पंच स्पर्धा आणि बाकीचा जो काही खर्च आहे. तो वाढला असल्यामुळे यावर्षी थोडीफार फीज वाढवण्यात आलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये ८० ते ९० टक्के शाळांनी फीज भरून झालेली आहे त्यामुळे कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 
स्नेहल साळुंखे,
जिल्हा क्रीडा अधिकारी                                    

शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये जे काय फीज वाढीचा माझ्याकडे तक्रारी आलेला आहेत. त्या संदर्भात मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना पत्रक पाठवले आहे आणि वाढलेल्या फिस बाबत विचारणा केली आहे मला त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.
 स्नेहा करपे,
सहाय्यक आयुक्त तथा नोडल क्रीडा अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका

Web Title: Fee hike in government competitions hits players many schools decide not to enter the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.