द्वारका विद्यामंदिर येथे ‘पर्व इतिहासाचे’ उपक्रम
By सचिन सागरे | Published: February 26, 2023 04:57 PM2023-02-26T16:57:30+5:302023-02-26T16:58:36+5:30
दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आली.
सचिन सागरे
कल्याण : जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्ताने पूर्वेतील नांदिवली येथील द्वारका विद्यामंदिर माध्यमिक व बाल विकास मंदिर प्राथमिक शाळा येथे ‘पर्व इतिहासाचे’ हा उपक्रम रविवार,२६ फेब्रुवारी रोजी राबविण्यात आला. या दोन दिवसीच उपक्रमात इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थापक दत्तात्रय दळवी, संचालिका मिरा दळवी, स्वप्नील दळवी यांच्या समवेत राघव राव, प्रभाकर उपाध्याय, उमेश कोलेटी, विनोद सोनावणे, उमाकांत चौधरी आणि संतोष खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना इतिहासाचे कालखंड व समग्र इतिहासाचे अवलोकन व्हावे या उद्दात हेतुने या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी मेहनत घेत उत्तम मांडणी व सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचे दर्जेदार प्रात्यक्षिक पाहुन उपस्थित पाहुणे भारावुन गेले. सदर प्रदर्शन विद्यालयाचे पालक व इतिहासप्रेमींसाठी खुले करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.