मैदानात महोत्सव होऊच देणार नाही; डोंबिवलीकरांनी दिला उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 03:36 PM2022-11-01T15:36:40+5:302022-11-01T15:37:22+5:30
खेळाडूंनीही व्यक्त केली नाराजी. डोंबिवली पश्चिमेला एकमेव असे कान्होजी जेधे (भागशाळा) मैदान आहे. या मैदानात मुलं नेहमीच विविध खेळाचा आनंद घेत असतात.
कमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली
डोंबिवलीमधील नागरिक अचानक पश्चिमेकडील भागशाळा मैदानात जमा झाले...नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला...वेळ पडली तर उपोषणाला बसू असा इशाराही देण्यात आला...याच कारण म्हणजे मैदानात चालणारे महोत्सव...आता पुन्हा या मैदानात एका महोत्सवाला परवानगी देण्यात आल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलय...20 ते 22 दिवस असे महोत्सव सुरू राहिले तर खेळाडूंनी खेळायचं कुठे असा सवाल उपस्थित करण्यात आलाय..इतकंच नाही तर त्वरित महोत्सव रद्द करावे अन्यथा मैदानातच उपोषणाला बसू असा इशाराही देण्यात आलाय...खेळाडू नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत आपली भूमिका व्यक्त केलीये..या मैदानाच्या बाहेर नागरिकांनी सह्यांची मोहीम देखील राबवली आहे.
डोंबिवली पश्चिमेला एकमेव असे कान्होजी जेधे (भागशाळा) मैदान आहे. या मैदानात मुलं नेहमीच विविध खेळाचा आनंद घेत असतात..सध्या शाळांना देखील सुट्टी आहे..अशातच या मैदानावर एक महोत्सव आयोजित करण्यात आलाय..त्याची तयारी देखील सुरू झाली. आयोजकांनी पालिका प्रशासनाकडून महोत्सवासाठी परवानगी मिळवली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवानगी देण्यास हरकत नाही मात्र 15 दिवसांपेक्षा एखाद्या महोत्सवाला परवानगी देत खेळाडूंची अडवणूक करणं योग्य नाही अशी भूमिका भाजपाचे पदाधिकारी राजेश म्हात्रे यांनी मांडलीये..मैदान हे खेळासाठी आहे त्याच साधन उत्पन्नाचं स्रोत म्हणून करू नये असं मत मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य तुषार भोईर यांनी मांडलंय.याच मैदानात फटके विक्रीस मनाई केल्याने फटके विक्री करणारे नाराज झाले होते. मात्र याच मैदानात महोत्सव भरविण्यास पालिका प्रशासनाकडून परवानगी कशी दिली जाते ? याबाबत देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. मनसेचे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे हे स्वखर्चाने मैदानाची निगा राखत असून मैदानात महोत्सव पाहिजेच कशाला? असा सवाल उपस्थित करत त्यांनीही याचा निषेध व्यक्त केला.
१९४७-४८ सुमारास सर्व सरकारी कर्मचारी ज्यात माजी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी होते त्यांनी मिळून डोंबिवली पश्चिमेला एक सोसायटी स्थापन केले. त्यावेळी काही एकर जमीन सरकारी दरात विकत घेतली. यात अडीच एकर जमीन खेळाचे मैदान म्हणून राखीव ठेवले होते.काही काळाने या मैदानाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर आली.आतापर्यंत खेळासाठीच या मैदानाचा वापर झाला अशी माहिती स्थानिक नागरिक मंगेश हरणे यांनी दिली...याआधी या मैदानावर अतिक्रमणाचा प्रयत्न झाला पण तो सफल झाला नाही. स्थानिक नागरिकांनी हे मैदान राखून ठेवले.आता महोत्सवाच्या नावाखाली बाजरीकरण सुरु आहे.वर्षातून दोन ते तीन वेळेला महोत्सव, उत्सव किंवा सांस्कृतिक कार्यक्रमास दिले जाते.नागरिकांच्या भावना समजून घेत प्रशासनाने महोत्सवाला परवानगी देऊ नये अशी विनंती देखील हरणे यांनी केली.